IMPIMP

‘उद्या कोरोना झाला तर आमच्यावर पावती फाडाल’, अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना ‘टोला’

by bali123
ajit pawar

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)कोरोना (COVID-19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं सरकारकडून वारंवार लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंग पाळा, सॅनिटायजर वापरा अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत. वाढत्या कोरोनामुळं सरकार चिंतीत आहे. दरम्यान विधीमंडळातील अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना मास्क न लावण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) नाव न घेताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘उद्या कोरोना झाला तर कशाला दृष्ट लावली म्हणून आमच्यावर पावती फाडाल’


अजित पवार (ajit pawar) म्हणाले, मंत्रिमंडळातील 7-8 सदस्य कोरोनाग्रस्त आहेत. आमदारांनाही कोरोन झालाय. फक्त मुख्यमंत्री, प्रवीण दरेकर आणि सभापतींना कोरोना झाला नाही. मला कोरोना झाला. देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाला, तुमची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असेल किंवा तुमचं जॅकेट पाहून कुठं आत शिरायचं म्हणून कोरोना झाला नसावा काय असेल माहिती नाही. कोरोना होऊ नये अशी इच्छा आहे. त्यामुळं उद्या समजा कोरोना झाला तर कशाला दृष्ट लावली म्हणून आमच्यावर पावती फाडाल असा चिमटा पवारांनी यावेळी बोलताना काढला.

‘राज्यावरचं कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही’


पुढं बोलताना ते म्हणाले, राज्यावरचं कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमरावती, अकोला, पुणे अशा विविध भागात कोरोना वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत. सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

‘काही नेते म्हणतात मी मास्क वापरत नाही…’


अजित पवार असंही म्हणाले, मास्क लावणं, सुरक्षित अंतर पाळणं याचे नियम पाळलेच पाहिजेत.
काही नेते म्हणतात मी मास्क वापरत नाही, परंतु दुसऱ्यांना त्रास झाला तर त्याचं काय.
एकेकाळी प्रवीण दरेकरांचे ते नेते होते असं म्हणत पवारांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.

‘मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय’


मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Language Day) मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena – MNS) वतीनं मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मात्र कोरोना (COVID-19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना गर्दी नाकारली होती.
शिवाजी पार्क येथे मनसेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा झाली.
तुम्ही मास्क का लावला नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय असं राज ठाकरे म्हणाले होते.
इतकंच नाही तर त्यांनी कोणत्याही बैठकीत किंवा कार्यक्रमातही कधी मास्क लावल्याचं कधी दिसलं नाही.

राम मंदिराचा निधी डान्स बार आणि बियर बारमध्ये उडवला जातोय का ? काँग्रेस नेत्याचा घणाघात

Related Posts