IMPIMP

मनसे-शिवसेना पुन्हा आमने-सामने ! आदित्य ठाकरेंच्या मतदार संघातील विकासकामांची ‘पोलखोल’ ?; शिवसेनेचं प्रत्युत्तर

by sikandershaikh
aditya thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) aditya thackeray | विकास कामाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. प्रेमनगर भागातील सार्वजिनक शौचालयाच्या कामावरून मनसेने फेसबूक लाइव्हद्वारे अजूनही जैसे थेच परिस्थिती असे म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे. त्याला शिवसेनेनेही जास्तच तसे उत्तर दिले असून केवळ राजकारणासाठी मनसे खोटेनाटे आरोप करत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

गेल्या काही महिन्यापासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या वरळी मतदारसंघातील प्रेमनगर रहिवाशी भागात सार्वजिनक शौचालयाची दुरावस्था सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर मनसेने फेसबुक लाइव्हद्वारे गतवेळी या ठिकाणीच्या नागरिकांचे हाल फेसबुकद्वारे मांडले याची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रेमनगर भागात शौचालयाच्या दुरुस्तीचा शुभारंभ करत नारळ वाढवला, मात्र दोन महिने उलटले तरी याठिकाणी प्रत्यक्षात कोणत्याही कामाला सुरुवात नाही, लोकांना आजही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, शौचालयांना दरवाजे, लाईट नाही, लोकांच्या तक्रारीकडे स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष संतोष धुरी यांनी केला.

त्यानंतर शिवसेना नगरसेवक आशिष चेंबुरकर यांनी मनसेने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
या भागातील शौचालयाच्या दुरुस्ती कामाचं ई टेंडर काढण्यात आलं होतं, त्याला निधी मंजूर झाला,
परंतु शौचालयाच्या दुरुस्तीऐवजी नव्याने शौचालय उभारणी करावी असं स्थानिक रहिवाशांनी पत्र दिले,
त्यांच्या मागणीनुसार याठिकाणी नव्याने शौचालय बांधण्यासाठी पुन्हा ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेतून जावं लागत
आहे, त्यामुळे हा विलंब झाला असून लवकरच या कामाला गती येईल असे चेंबूरकर यांनी सांगितले.

विकासकामांमध्ये मनसे राजकारण करण्याचं काम करत आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर खोटेनाटे आरोप लावून टीका करणे, योग्य नाही, याठिकाणी कामं कोणं करतं हे जनतेला माहिती आहे,
केवळ फेसबुकद्वारे लाईव्ह करून शिवसेनेवर आरोप करण्याचं काम मनसेने बंद करावं असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकरांची PM मोदींवर टीका, म्हणाले – ‘…म्हणून मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं’

Related Posts