IMPIMP

Devendra Fadnavis : ‘ज्या राज्यपलांना अपमानित केलं जातं, त्यांचा अभिनंदन प्रस्ताव येतो तेव्हा…’

by sikandershaikh
uddhav-thackeray-governor-devendra-fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी खासकरुन राज्यपाल आणि सरकारमधील वादावर भाष्य केलं. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वीजबिल माफीसह इतर मुद्यावर भाजपचे आमदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. सुरुवातीला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपाल आणि सरकार हा वाद महाराष्ट्राला नवीन नाही. अंतुले, विलासराव देशमुख यांच्या काळात देखील वाद झाले होते. मात्र, अशी अवस्था आली नाही, की राज्यपाल विमानात जाऊन बसले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला परवानगी नाही. राज्यपाल व्यक्ती नाही पद मोठं आहे. रोज ज्या राज्यपालांना अपमानित करतो त्यांचा अभिनंदन प्रस्ताव येतो तेव्हा समाधान वाटतं, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राज्यपाल तिथे गेले, विमानात इंधन भरलेलं होतं. मग परवानगी नसताना इंधन कसं भरलं ? परवानगी नसताना त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला ? ते आतमध्ये जाऊन विमानात कसे बसले ? राज्यपाल आणि आपल्यात मतभेद असतील पण मनाचा इतका कोटेपणा दाखवू नये. राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचं नाही तर पद महत्त्वाचं असतं. आपल्या प्रोटोकॉलमध्ये राज्यपाल पहिल्या क्रमांकावर येतात. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात कोणाला विमान द्यायचं अशी वेळ आली तर राज्यपालांना द्यायचं असतं, असे म्हणत फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी वर बोलताना फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले,
सर्वात आधी माझं कुटुंब माझी जबाबदारी… आता मीच जबाबदार.. म्हणजे सरकारची काहीच जबाबदार नाही.
सरकार हात झटकून मोकळं आहे.
आपली पाठ थोपटण्यासाठी तयार आहे. सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली मोदींची.
आमची काही जबाबदारीच नाही अशा प्रकारची अवस्था पहायला मिळत आहे.
राज्यपालांचं भाषण म्हणजे पुढील एक वर्षात काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे यासंदर्भात असलं पाहिजे.
पण त्यात काहीच पहायला मिळालं नाही.
यमक जुळणारी भाषा यशाचे गमक होऊ शकत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

आ. रोहित पवारांची PM मोदींकडे मागणी, म्हणाले – ‘या’ कारणामुळं ‘पेट्रोल-डिझेल’वरील सेस कमी करावा

Related Posts