IMPIMP

धनंजय मुंडेंची पंकजा मुंडें वर जहरी टीका; म्हणाले – ‘हा तर पळकुटे पणा’

by pranjalishirish
Dhananjay Munde | dhananjay munde defeated kej nagar panchayat election congress forms alliance with bjp in beed

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  Dhananjay Munde यांनी ‘पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांचा पळपुटेपणा केला’ अशा शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीड जिल्हा बँकेच्या ८ जागांसाठी हि निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांच्याकडून घेण्यात आला. यावरून धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

Facebook login करण्याअगोदर तुम्हाला करावे लागणार ‘हे’ काम

काय म्हणाले धनंजय मुंडे
‘सहकार मंत्र्यांनी जिल्हा बँक संदर्भात जो निर्णय दिला. त्या निर्णया विरोधात माजी मंत्री हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. पण सहकार मंत्र्यांनी दिलेला निर्णय हायकोर्टाने कायम ठेवला आहे. तसेच हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपाच्या माजी मंत्र्यांना मान्य झाला नाही. भाजपाकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचे मतदार यांचे ऐकत नाहीत असे दिसत आहे. २१ तारखेला निकालाच्या दिवशी जी नामुष्की ओढवणार होती. ती थोडीशी अब्रू वाचविण्यासाठी भाजपने पळपुटेपणा केला असा आरोप धनंजय मुंडे  Dhananjay Munde यांच्याकडून करण्यात आला आहे.

1 जूननंतर हॉलमार्कशिवाय होणार नाही सोन्याची विक्री, फक्त ‘या’ 3 गुणवत्तेचेच दागिने विकण्यात येणार

शुक्रवारी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत एकही मतदार उमेदवार निवडणुकीत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर धनंजय मुंडे  Dhananjay Munde यांनी हि टीका केली आहे. बीड जिल्हा बँकेच्या १९ पैकी ९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीतून मतदानाच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माघार घेतली असताना देखील महाविकास आघाडी हि निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार आहे. एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल विश्वास नसल्याचे हे लक्षण आहे.

दिल्लीच्या ‘लॉबी’कडे बोट दाखवत, शिवसेनेची परमबीर सिंह यांच्यावर ‘स्तुतीसुमने’

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या ६ जागा लढवण्यात येणार आहे. आम्ही या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरे जात असून, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घ्यावे,जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाचा कारभार पाहता एकूण मतदानापैकी ९० टक्के मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळेल, असा विश्वास आघाडीचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Aslo Read : 

‘…मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का ?’

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

Related Posts