IMPIMP

पंढरपूर पोटनिवडणूक : 11 जणांची निवडणुकीतून माघार तर 19 उमेदवार रिंगणात; नेत्यांच्या विनंतीनंतरही ‘हा’ उमेदवार मैदानात

by pranjalishirish
eleven candidates have withdrawn their nomination papers pandharpur election 19 will be fight election

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन-  पंढरपूर pandharpur -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळं पोटनिवडणूक होत आहे. आज (शनिवार, दि 3 एप्रिल रोजी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे (Siddheshwar Awatade) यांनी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळं त्यांना कुटुंबातील बंडखोरीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट झालं. सध्या 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले, मोहन हळणवर यांच्यासह 11 जणांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

‘महाराष्ट्राच्या वाट्याला किती शून्य आले हे फडणवीसांनी सांगावे’; आव्हाडांचा टोला

दाखल झाले होते 38 उमेदवारी अर्ज, 8 अर्ज अवैध ठरले

पंढरपूर pandharpur -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी एकूण 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8 उमेदवारांचे अर्ज हे अवैध झाले होते. उर्वरीत 30 पैकी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू, मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, पंढरपूर pandharpur  नगरपालिकेतील सत्ताधारी परिचारक यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती, पंढरपूर pandharpur  मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश भोसले, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे ही लोकं कोणती भूमिका घेतात, कोण कोण अर्ज मागे घेतं याकडं दोन्ही तालुक्यांचं विशेष लक्ष लागलं होतं.

चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘थोडा अभ्यास करत चला !’

सिद्धेश्वर आवताडेंनी अर्ज मागे घ्यावा म्हणून विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली चर्चा

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil), आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी सिद्धेश्वर आवताडेंसोबत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबद्दल चर्चा केली होती. परंतु सिद्धेश्वर आवताडे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सिद्धेश्वर आवताडेंसोबत काल (शुक्रवार, दि 2 एप्रिल) पुन्हा प्रदीर्घ चर्चा केली होती. तरीही त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार हे त्यांनी स्पष्ट केलं. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती.

‘…त्यावेळी ‘कृष्णकुंज’ हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता’, मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

शैला गोडसे यांनीही कायम ठेवली उमेदवारी, तर 11 जणांचा उमेदवारी अर्ज माघारी

महेंद्र काशिनाथ जाधव (पीपल्स रिपब्लिककन पार्टी), नागेश भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर (अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष), संजय चरणू पाटील (अपक्ष), अमोल अभिमन्यू माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (अपक्ष), रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

नाना पटोलेंची माजी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘मोदी-शहा हे फडणवीसांना गांभीर्यानं घेत नाहीत म्हणून…’

हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

भगीरथ भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस), समाधान महादेव आवताडे (भाजप), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोंडीबा भोसले (बळीराजा पार्टी), सिद्धेश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसंच अपक्ष म्हणून संतष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले, सुनील सुरेश गोरे, सीताराम मारूती सोनवले, सिद्धेश्वर बबन आवताडे, सदुर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळ, सुदर्शन पांडुरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून निवडणूक लढवणार आहेत.

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

17 एप्रिल 2021 रोजी मतदान, तर 2 मे 2021 रोजी मतमोजणी

निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितलं की, शनिवारी 17 एप्रिल 2021 सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. रविवारी (दि 2 मे 2021) मतमोजणी होणार आहे अशी माहितीही गुरव यांनी दिली.

Also Read : 

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’

Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

उद्योजक महिंद्रांबाबतच्या विधानावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनाावलं, म्हणाले – ‘…म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत

Related Posts