IMPIMP

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ED कडून निकटवर्तीयाच्या घरावर छापा

by bali123
former home minister anil deshmukh case ed raids sagar bhatewars house at nagpur

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोपामुळे अडचणीत आलेले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख anil deshmukh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख anil deshmukh यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा अद्याप सुरु असतानाच ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आज (मंगळवार) नागपूरमधील त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला आहे.

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

ईडीने अनिल देशमुख anil deshmukh यांच्याविरोधात ECIR म्हणजे FIR दाखल केला आहे. त्यानंतर आज सकाळी नागपूरमध्ये ईडीने छापा टाकला आहे. नागपूर शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सागर भटेवार यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे निकवर्तीय व व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. सागर भटेवार हे मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला असल्याचे सूत्रांकडून समजतेय. ईडीची टीम भटेवार यांच्याकडे चौकशी करत आहे.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, अनिल देशमुख anil deshmukh यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयाने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. आता या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ECIR म्हणजेच FIR दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयाने देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करुन त्या तपासाच्या आधारे 21 एप्रील रोजी दिल्ली येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयाने अनिल देशमुख anil deshmukh यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts