IMPIMP

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

by bali123
former mp nilesh rane has criticized cm uddhav thackeray along shiv sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते हे नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही असतात. पण मंगळवारी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरच निशाणा साधला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिवाकर रावते यांनी इंग्रजी भाषेच्या वापराला विरोध केला. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दिवाकर रावतेंनी शिवसेनेलादेखील सुनावले. मराठी शब्द संग्रह असतानासुद्धा इंग्रजीचा वापर करणे चुकीचे आहे. सभागृहाच्या कामकाजाच्या वेळी इंग्रजी भाषेचा वापर करण्यात येतो हे खूप हास्यास्पद आहे. दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे uddhav thackeray महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त केला नाही याची खंत व्यक्त केली. तसेच मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ? अशी संतप्त भावनासुद्धा दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

दिवाकर रावते यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. नीलेश राणे यांनी जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की, सभागृहात “आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार” असं बोलून गेले. उद्धव ठाकरे फक्त ३५ टक्के शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे uddhav thackeray पक्षप्रमुखदेखील राहणार नाहीत,” अशा शब्दांत ट्विटरद्वारे टीका केली.

मराठी ही राजभाषा असताना प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. परंतु आज तसे काही होताना दिसत नाही. मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव आजही तेच आहे बदललं जात नाही. तसेच मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन बांधण्यात येतात, पण मराठी भवन का नाही? शिवसेनेला मराठीबाबत एक शब्द उच्चारता आला नाही हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत दिवाकर रावते यांच्याकडून पक्षाला घरचा आहेर देण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे या मुद्द्यावरूनसुद्धा दिवाकर रावते यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले. संभाजीनगर बोलायचं नाही कारण हे किमान समान कार्यक्रमात नाही, मराठीबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही हे मला बोलावं लागतंय. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी मराठीसाठी अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद नाही, अशा प्रकारची टीका दिवाकर रावते यांनी केली आहे.

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

Related Posts