IMPIMP

Great ! ‘मला अभिमान आहे, 17 लाख कोटींच्या कामात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही’ – नितीन गडकरी (व्हिडीओ)

by bali123
Aurangabad - Pune Expressway Project | Union Minister of Roads and Transport nitin gadkari announces aurangabad to pune express highway project

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – मागील सरकारच्या काळात 17 लाख कोटी रुपयांची कामे केली. या सरकारमध्ये 4 लाख कोटींच्या कामांचे आदेश आलेले आहे. ही कामे करत असताना मी जर कुणाकडून पैसे घेतले असते तर ते लपून राहिले नसते. त्यामुळे मी केलेल्या कामात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही. मात्र आता संपूर्ण सिस्टम भ्रष्टाचाराने बरबटली आहे. हे सांगताना मी कोणाला घाबरत नाही. कारण मी लॉजिकल कामे करतो, पारदर्शकतेने करतो, भ्रष्ट्राचारमुक्त, वेळेच्या आत करतो आणि रिझल्ट देतो. मोदींच्या सरकारमध्ये मी हे बेधडकपणे बोलू शकतो, याचा मला अभिमान असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी nitin gadkari यांनी म्हटले आहे.

एनएचएआयच्या मुख्य इमारतीला 2 वर्षाऐवजी 13 वर्षे लागली. 120 कोटी रुपयांऐवजी 350 कोटी रुपये लागले. त्या इमारतीच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी या प्रकाराबाबत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची जाहीरपणे लाज काढली. यावरुन नितीन गडकरी यांना तुम्ही देशभर लाखो कोटी रुपयांची कामे करता. सरकारी यंत्रणेतून ही कामे होत असतात. तेव्हा एखाद्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होईल अशी भीती वाटते का, असा प्रश्न नितीन गडकरी nitin gadkari यांनी विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

रस्त्यांची कामे करताना विश्वविक्रम केला
नितीन गडकरी nitin gadkari यांनी सांगितले की, 35 किलोमीटर प्रतिदिवस प्रमाणे रस्त्यांची कामे पूर्ण केली आहे. 40 कोटी रुपयांचे रस्ते आज आम्ही देशात बांधत आहोत. जगात रस्त्यांची येवढी कामे कोणत्याही देशात होत नाही. एक विश्वविक्रम केला आहे. नुकताच आम्ही सोलापूर ते विजापूर हा 25 किलोमीटरचा एक लेनचा रस्ता 24 तासात पूर्ण केला. तसेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर 35 किलोमिटरचा एक रस्ताही आम्ही 24 तासात पूर्ण केला आहे. हा देखील एक विश्वविक्रम आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले आणि वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. माझा तो प्रहार देशहितासाठी आणि वाईट प्रवृत्तीवर होता, असे  गडकरी यांनी सांगितले.

माणसांना कधीच ‘यूज अँड थ्रो’ केले नाही
माझ्या सोबत काम करणाऱ्या लोकांना मी माझा परिवार मानतो. त्यामुळे पुढील सर्व अडचणी दूर होतात. मी महाराष्ट्र सरकारमध्ये काम केले, केंद्र सरकारमध्ये काम केले आणि आजही निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांशी माझे पारिवारीक संबंध आहेत. माणसांना कधीच ‘यूज अँड थ्रो’ मी केले नाही. त्यामुळे मी ज्यांच्यासोबत काम केले त्या लोकांनी माझ्यावर मानपासून प्रेम केले असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

 

Also Read:
‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts