IMPIMP

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

by pranjalishirish
shiv sena slams opposition maharashtra lockdown coronavirus patients numbers increased

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोना (COVID-19) चा कहर दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा आणि बेड कमी पडू लागले आहेत. लोक अजूनही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. लग्न समारंभातही गर्दी होताना दिसते आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सोमवारी (दि 29 मार्च) झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरीत लावण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन Lockdown  लागू करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशात विरोधी पक्षांसह अनेकांनी याला विरोध केला आहे. यावर आता शिवेसेनेनं (ShivSena) भाष्य केलं आहे. टाळेबंदी करून लोकांना घरी बसायला लावण्याचा सरकारलाही काही छंद नाही. मात्र कोरोनाची दुसरी लाट अधिक भयंकर आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्यावाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. हे काही आपल्याला शोभणारं नाही असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

‘हे चित्र तरी राज्याला परवडणारं आहे काय ?’

शिवसेनेनं सामनाच्या संपादकीय मधून याबाबत भाष्य केलं आहे. यात म्हटलं आहे की, राज्याला पुन्हा लॉकडाऊन Lockdown  परवडणारा नाही असं सगळ्यांचंच म्हणणं आहे व ते योग्यच आहे. महाराष्ट्रात रोज 25 हजारांवर कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत 5-6 हजार रोजचा आकडा आहे. इस्पितळे भरली आहेत आणि रुग्णांसाठी खाटा नाहीत. हे चित्र तरी राज्याला परवडणारं आहे काय ? राज्यात कोरोना संसर्गाला लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्या लॉकडाऊनवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

‘प्रत्येकाचं म्हणणं आपापल्या पातळीवर योग्यच आहे’

अग्रलेखात पुढं लिहिलं आहे की, महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू कराल तर याद राखा. रस्त्यावर उतरू असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. लॉकडाऊन नकोच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल (Praful Patel) सांगत आहेत. लॉकडाऊनमुळं लोकांचा बुडणार आहे. त्याची भरपाई सरकारनं रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितलं आहे. रुग्णवाढ रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) सांगत आहेत. प्रत्येकाचं म्हणणं आपापल्या पातळीवर योग्यच आहे.

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

‘गेला गेला कोरोना गेला आहे असं मानून लोकांनी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गर्दी सुरू केली…’

अग्रलेखात लिहिलंय की, लोकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकरी यास कारणीभूत आहे. गेला गेला कोरोना गेला आहे असं मानून लोकांनी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गर्दी सुरू केली. त्यात मास्क लावायचा नाही, सोशल डिस्टेंसिंग पाळायचं नाही. ग्रामीण भागात तर लग्न समारंभ साजरे केले त्यात हजारोंची गर्दी करून लोकांनी कोरोनासाठी पुन्हा पायघड्याच घातल्या.

‘या प्रश्नांची उत्तरं राज्यातील रोज वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या आकड्यात आहेत’

अग्रलेखात असंही लिहिलं आहे की, महाराष्ट्रात लॉकडाऊन  Lockdown नसला तरी रात्रीचे निर्बंध कडक केले आहेत. हे निर्बंधदेखील पाळायला लोक तयार नसतील तर सरकारला कठोर उपाययोजना कराव्या लागतील. उत्तर प्रदेशात मथुरेत-वृंदावनात लाखो लोकांनी होळीचा सण साजरा केला. त्यांना कोरोना होत नाही. मग आम्हालाच कसा होईल ? तर्कच चुकीचे आहेत. प. बंगालमधील प्रचारसभेत हजारोंची गर्दी होतेच. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली विना मास्क रोड शोचं शक्तिप्रदर्शन होत आहे. मग महाराष्ट्रातच लॉकडाऊनचा विचार का करता ? या प्रश्नांची उत्तरं राज्यातील रोज वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या आकड्यात आहेत. एकंदरीत देशातच कोरोनाची स्थिती वाईटाहून अधिक वाईट झाली आहे. या क्षणी देशात कोविड रुग्णांची संख्या दीड कोटीच्या आकड्यात पोहोचली आहे.

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवणं गरजेचं’

अग्रलेखात असाही उल्लेख आहे की, राज्यात सर्वाधित मृत्यू नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात 54 रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर महापालिका आणि शहराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

Related Posts