IMPIMP

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

by pranjalishirish
home minister anil deshmukh did not resign ncp made it clear nawab malik

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे गृहमंत्री मागच्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. परमबीर सिंग यांच्याकडून कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख  Anil Deshmukh यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून देण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे जो वाद निर्माण झाला आहे त्या संदर्भात उत्तर देताना नवाब मलिक यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

परमबीर सिंग यांनी त्यांची बदली झाल्यानंतर हि चिठ्ठी लिहिली आहे. परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी बदली होणार हे माहित होते. तेव्हा त्यांनी १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. या चॅटमध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  Anil Deshmukh हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेना भेटले असा उल्लेख केला आहे. त्यावेळी अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते १५ दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असतानादेखील गृहमंत्र्यांविरोधात पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता असे नवाब मलिक म्हणाले आहे. तसेच हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत याची चौकशी करण्यात येईल या चौकशीत जे निष्पन्न होईल त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल असेदेखील नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट झाल्याने महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. यानंतर विरोधीपक्षाकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच्या संदर्भात राज्यभर आंदोलने करण्यात आले होते. तेव्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तो चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. भाजप नेते रस्त्यावर उतरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर आता भाजपचे नेते आमदार राम कदम हे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेणार आहेत.

Also Read : 

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर ‘निशाणा’, फडणवीसांनी केला ‘पलटवार’

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले..

Related Posts