IMPIMP

HC नं CBI ला चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता?

by pranjalishirish
Home Minister Anil Deshmukh likely to resign after HC orders CBI probe?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकताच केला आहे. या कथित आरोपाची सीबीआयने प्राथमिक चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश सोमवारी (दि. 5) मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सिंग यांची याचिका निकाली काढताना, त्‍यांनी पोलिस बदल्‍यासंदर्भात केलेल्‍या तक्रारी संबंधित यंत्रणेसमोर मांडाव्‍यात असेही न्‍यायालयाने म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून ते राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वेगाने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख  Anil Deshmukh यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी झाली तर सरकारची नाचक्की होऊ शकते. यासाठी त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देशमुखावरील आरोपाचे प्रकरण भाजपने लावून धरले आहे. त्यात आता देशमुखांवर केलेल्‍या आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts