IMPIMP

Devendra Fadnavis : ‘निवृत्त’ न्यायाधीश ‘विद्यमान’ गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार?

by pranjalishirish
how will a retired judge without power enquire against a sitting home minister red question mark ornament says devendra fadanvis

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी मुंबई उच्च न्यायालाचे निवृत्त न्यायमुर्ती कैलास चांदीवाल (Kailash Chandiwal) यांची एक सदस्यीस उच्चस्तरीय समिती करणार आहे. मंगळवारी सामान्य प्रशासन विभागानं याबाबत आदेश काढला. यावरून आता भाजपनं राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या समितीकडे बोट दाखवत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे आणि काही सवालही केले आहेत. कोणतेही अधिकार नसताना एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार? असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘अनिल देशमुखांवरील ‘त्या’ 100 कोटींच्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळयात निव्वळ धुळफेक’

‘…त्यामुळं ही समिती निव्वळ धूळफेक आहे’

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  म्हणाले, कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अॅक्ट 1952 अंतर्गत के यु चांदीवाल चौकशी समिती गठित करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आमच्या काळात न्या. झोटींग समिती गठित करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते. गठित करण्यात आलेल्या या समितीला मात्र साध्या समितीचा दर्जा देण्यात आला आहे. इतकंच नाही तर या समितीला न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळं ही समिती निव्वळ धूळफेक आहे अशी टीकाही त्यांनी केली.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

‘कोणतेही अधिकार नसताना निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार ?’

पुढं बोलताना फडणवीस  Devendra Fadnavis म्हणाले, या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता, त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही. आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार ? असा सवालही त्यांनी केला आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

या चौकशी समितीचं नेमकं काम काय ?

दरम्यान परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारं पत्र 20 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना लिहिलं होतं. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे गृहमंत्री देशमुख यांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतंही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याचं निष्पन्न होईल असा काही पुरावा परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts