IMPIMP

‘मी खोटं बोलायला आलो नाही, माझं नाव नरेंद्र मोदी नाही, ते 24 तास खोटं बोलतात’, राहुल गांधींची PM मोदींवर टीका

by pranjalishirish
'I have not come to lie, my name is not Narendra Modi, he lies for 24 hours', Rahul Gandhi criticizes PM Modi

कामरुप/ आसाम : वृत्तसंस्था- देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आसाममध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राहुल गांधी Rahul Gandhi  मागील काही दिवसांपासून आसाममध्ये प्रचार करत आहेत. आज (बुधवार) राहुल गांधी यांनी आसामच्या कामरुपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘तुम्हाला जर खोटं ऐकायचे असेल, आपला टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा, ते दिवसाचे 24 तास खोटं बोलतात’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी सीएएच्या मुद्यावरुन देखील भाजपवर टीका केली.

‘अनिल देशमुखांवरील ‘त्या’ 100 कोटींच्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळयात निव्वळ धुळफेक’

माझं नाव नरेंद्र मोदी नाही

कामरुपमध्ये झालेल्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी Rahul Gandhi  म्हणाले, मी इथे तुमच्याशी खोटं बोलण्यासाठी आलेलो नाही. कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही. आसाम, शेतकरी किंवा इतर कोणत्याही गोष्टीविषयी जर खोटं ऐकायचे असेल तर, तुम्ही टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींच तोंड बघा, ते पूर्ण 24 तास खोटं बोलतात. भाजपकडून रोजगार देण्याचा प्रयत्न केला जात नाही. युवकांना मदत केली जात नाही. उलट आसामवर आक्रमण केले जात आहे. सीएए हा कायदा आसामवरचं आक्रमण असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

यामुळे सीएएला विरोध

सीएएच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी  Rahul Gandhi यांनी सांगितले की, हा फक्त एक कायदा नसून हा तुमचा इतिहास, भाषा आणि बंधुत्वावर हल्ला आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करत असल्याचे राहुल यांनी म्हटले.

प्रचारादरम्यान राहुल गांधी सीएए कायद्यावरुन भाजपवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर हल्लाबोल केला आहे.

गांधी भाऊ-बहीण पर्यटनाला आलेत

अमित शहा म्हणाले, काँग्रेसचे हे दोन नेते भाऊ-बहीण आसाममध्ये पर्यटनासाठी आले आहेत. राहुलबाबांना पाहिलं की नाही ? अद्याप चहाच्या मळ्यात पानं आलेली नाहीत, तेवढ्या प्रियंका गांधी पानं तोडतानाचे फोटोसेशन करत आहेत. प्रियांका गांधी आधी फोटो काढून घेतील. नंतर चहा मळेवाल्यांचं जे व्हायचं ते होवो, असा टोला अमित शहांनी लगावला.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

मुळापासून उखडून टाकू

बद्रुद्दीन अजमल यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अमित शहा म्हणाले, काल बद्रुद्दीन अजमल म्हणाले की सरकारची चावी माझ्या हातात आहे. पण सरकारची चावी तुमच्या नाही तर आसामच्या जनतेच्या हातात आहे. आसामला आम्ही घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही. तुम्हाला मुळापासून उखडून टाकण्याचं काम भाजप करेल. असे शहा यांनी म्हटले.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts