IMPIMP

भाजपला दणका ! 33 कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी

by sikandershaikh
fadnavis-government-ajit-pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरु असून बुधवारी विधानसभेत शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी विचारलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या प्रश्नावरून काँग्रेसही आक्रमक झाली. तत्कालीन सरकारने वृक्ष लागवडीसाठी दिलेल्या २ हजार ४२९ कोटींचा निधी पूर्ण वापरण्यात आला आहे मात्र काही ठिकाणी केवळ खड्डे खोदण्यात आल्याचा आरोप करत तत्कालीन सरकारच्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केली. ही वृक्षलागवड फडणवीस सरकारच्या काळात झाली असून त्यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.

विधानसभेत शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीबाबत विचारलेल्या प्रश्नांना वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी उत्तरे दिली,
तत्कालीन फडणवीस सरकारने २ हजार ४२९ कोटी खर्च करून वनविभागाकडून २८.२७ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२० अखेर त्यातील ७५.६३ टक्के झाडे जिवंत असल्याचे भरणे यांनी सांगितले.

दरम्यान, याच मुद्द्यावरून काँग्रेसही आक्रमक झाली.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पाटोले यांनी अनेक ठिकाणी केवळ खड्डे खोदले पण लागवड केलीच नाही.
तशा बातम्या समोर आल्या आहेत.
२५ टक्के झाडे जगलेली नसल्याचे सांगत विधिमंडळाच्या संयुक्ती समितीमार्फत या लागवडीची चौकशी करण्याची मागणी केली.
तर तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे, ही वृक्षलागवड एक जनचळवळ बनली, असे सांगत या मोहिमेचे यश अधोरेखित केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे, प्रकाश साळुंके, धर्मरावबाबा आत्राम यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

समितीला चार महिन्यांची मुदत

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या प्रकरणी ३१ मार्चपर्यंत समिती स्थापन करून त्यांना अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात येईल.
आवश्यकता वाटल्यास आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देऊन या प्रकरणी सहा महिन्यांत सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : ‘उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रिपद जावं’ !

Related Posts