IMPIMP

‘मला ED च्या तारखा पाहून कोरोना होत नाही’, भाजपच्या नेत्याची एकनाथ खडसेंवर टीका

by pranjalishirish
Maharashtra MLC Election 2022 | maharashtra vidhan parishad election 2022 chief minister uddhav thackeray said that will vote for ncp leader eknath khadse say independent mla chandrakant patil

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे. महिलांवर बलात्कार, खून यांसारख्या घटना घडत आहेत तर अधिकारी 100 कोटींची खंडणी वसूल करण्यासाठी नाही ते उद्योग करत आहेत.. आणि गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. अशी परिस्थिती मी माझ्या ३० वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मी पहिल्यांदा अनुभवत आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे लक्तरे तोडले जात असून पोलिस यंत्रणचे मॅारल डाऊन झाले आहे. तसेच मंत्री वाटेल तसे मागण्या व अत्याचार करत आहे अशी टीका करत माजी मंत्री तथा भाजपचे BJP आमदार गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर हल्लबोल केला आहे.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

गिरीश महाजन आज जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महिला रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबद्दल मला काहीच माहित नाही. गेल्या ३ आठवड्यांपासून मला कोरोना झाल्यामूळे मी रुग्णालयात उपचार घेत आहे. मी आजच जळगावात आलो आहे. त्यामुळे मला याबद्दल काहीच माहित नाही. मी उद्यापासून पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी जाणार आहे.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

मला इडीचा कोरोना नाही

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, मला इडीच्या तारखा पाहून असा कोरोना झाला नाही. माझ्यासह माझ्या घरातील सर्वच कुटूंब कोरोना बाधित होते आणि सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार चालू होते. कालच माझी चाचणी निगेटिव्ह आली आहे. परंतु मी इडीच्या तारख्या आल्या की खोटे रिपोर्ट बनवून कोरोना दाखवायचा आणि क्वारंटाईन व दवाखान्यात भरती होण्याचे खोटेपणा मी काही दाखवलेला नाही. आता तर सगळ्यांचाच कोरोना होत आहे. अशा शब्दांत त्यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली आहे.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

सोडून गेलेले नगरसेवकांचे काय करायचे बघू
जळगाव महापालिकेत शिवसेनेने सर्जिकल स्ट्राईक करत एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने सत्ता आपली असून तुम्हाला काही होवू देणार नाही असे सांगून भाजपचे BJP नगरसेवक फोडले. आता पुढे या नगरसेवकांचे काय करायचे ते बघू, पक्षांतर्गत कायद्या नुसार कारवाई कशी करायची ती आम्ही बघू असा इशारासुद्धा गिरीश महाजन यांनी दिला आहे.

भाजप अन् राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा Lockdown ला विरोध ? नेते म्हणाले – ‘पुन्हा लॉकडाऊन करुन लोकांना त्रास देऊ नका’

आमदाराला तुरुंगात ठेवणे कितपत योग्य
चाळिसगावचे भाजपचे BJP आमदार मंगेश चव्हाण यांच्याबद्दल गिरीश महाजन यांना विचारले असता एखाद्या आमदाराने शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले म्हणून त्याला वरून फोन येऊन त्याला तुरुंगात टाकले जाते हा कुठला प्रकार आहे. त्या आमदाराने शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन केले आहे. पण आम्ही कोरोनामुळे शांत बसलो आहे नाहीतर आम्ही एक आवाहन केले तर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आला आहे.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts