IMPIMP

न्यायालयाकडून देखील भाजपला दणका ! जळगाव पालिकेवर फडकणार सेनेचा भगवा?

by pranjalishirish
Yakub Memon Grave | yakub menon grave beautification controversy shiv sena leader ambadas danve answer to bjp ashish shelar chandrashekhar bawankule criticism

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – जळगाव महापौरपदाची निवडणूक election  टाळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेणाऱ्या भाजपची (Bharatiya Janata Party – BJP) याचिका कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळं आता महापौरपदाची निवडणूक election ही ऑनलाईन होणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) शिवसेनेनं (ShivSena) जोरदार सर्जिकल स्ट्राईक केला आणि 30 नगरसेवक आपल्या तंबूत ओढून आणले आहेत. त्यामुळंच ही निडवणूक टाळण्यासाठी भाजपनं कोर्टात धाव घेतली होती.

‘कोरोनामुळं निवडणूक ऑनलाईन घ्यावी असा आदेश कोर्टानं दिला’

जळगावात सत्तेत अससेल्या भाजपच्या 57 नगरसेवकांपैकी 30 नगरसेवकांना शिवसेना आणि राष्ट्रवादीनं सेनेत दाखल केलं आहे. यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होईल या भीतीनं भाजपनं औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. जे नगरसेवक शिवसेनेते दाखल झाले आहेत त्यांना व्हिप न बजावता आल्यानं भाजपनं कोर्टात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घेतली तर व्हिप बजावता येईल अशी भूमिका मांडली. परंतु औरंगाबाद खंडपीठानं मात्र भाजपची याचिका फेटाळून लावली आहे. कोरोनामुळं निवडणूक election ऑनलाईन घ्यावी असा आदेश कोर्टानं दिला आहे. यामुळं आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेकडून जयश्री महाजन तर कुलभूषण पाटील यांचं नाव उपमहापौरपदासाठी निश्चित झालं आहे. आज सकाळी 11 वाजता दोघांनीही अर्ज दाखल केले आहेत. या दोघांचा विजय होणार असल्याचीही जोरदार चर्चा सध्या होत आहे.

‘भाजपनं मात्र अद्यापही आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत’

परंतु भाजपनं मात्र अद्यापही आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत. भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांची नावं महापौरपदासाठी सर्वात आघाडीवर आहेत. परंतु उपमहापौरपदासाठी अद्याप कुठल्याही नावावर चर्चा झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts