IMPIMP

एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा, म्हणाले – ‘ED लावून छळ करणारे तुम्हीच !’

by pranjalishirish
jalgaon ncp lider eknath khadse reply allegation girish mahajan

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ईडी आणि जळगाव महापालिकेतील सत्तांतराच्या मुद्द्यावर भाष्य करत भाजपचे जळगावातील नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसेंनी यावर भाष्य केलं.  जळगावातील महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्यानं गिरीश भाऊंना जो झटका बसला त्यामुळं त्यांना ईडी ची आठवण आता येऊ लागली आहे. ईडी लावून छळण्याचा प्रकार कोण करतं हे सर्व जगाला माहिती आहे असं ते म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

‘तुम्हीच ईडी लावून छळ करता हे जगाला माहिती आहे’

गिरीश महाजन यांच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ खडसे  Eknath Khadse म्हणाले की, जळगावातील महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्यानं गिरीश भाऊंना झटका बसला आहे. त्यामुळं त्यांना आता ईडीची आठवण येऊ लागली आहे. ईडी तुम्हीच लावता. दुसरे कोणं लावणारे आहेत. तुम्हीच ईडी लावून छळ करता हे जगाला माहिती आहे अशी जोरदार टीका खडसे यांनी केली.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

‘मला काही नौटंकी करण्याची सवय नाही’

पुढं बोलताना ते म्हणाले, गेल्या 20 दिवसांपासून मी कोरोना झाल्यामुळं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे उपचार घेत होतो. मला खूप त्रास झाला. मला जाणीव आहे कोरोनामध्ये किती त्रास होतो. त्यामुळं मला काही नौटंकी करण्याची सवय नाही असंही त्यांनी सांगितलं.

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

काय म्हणाले होते गिरीश महाजन ?

गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय महिला रुग्णालयाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना एकनाथ खडसे Eknath Khadse  यांच्यावर आरोप करत टीका केली होती. ईडीची तारीख आल्यावरच त्यांना कोरोना कसा होतो असा सवाल महाजन यांनी केला होता. यालाच आता खडसेंनी उत्तर दिलं आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

Related Posts