IMPIMP

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

by Team Deccan Express
jayant patil criticizes sambhaji bhide controversial statement and bjp up

सांगली : सरकारसत्ता ऑनालाइन – कोरोना हा आजारच नाही, तो फक्त विशिष्ट लोकांनाच होणारा आजार आहे, असे म्हणत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी एक आक्षेपार्ह शब्द वापरला होता. कोरोना संसर्ग होणाऱ्या नागरिकांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील jayant patil  यांनी संभाजी भिडे यांचा समाचार घेतला आहे.

संभाजी भिडे यांचे वक्तव्य हे निषेधार्ह आहे. सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असताना अशी विधाने ही कोरोनाला आळा घालण्यासाठी बाधा ठरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत आणि भाजप नते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोना झाला होता, असे म्हणत जयंत पाटील यांनी टोलेबाजी केली. सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील jayant patil बोलत होते.

प्रकाश जावडेकरांच्या ‘ज्ञानामृता’ची महाराष्ट्राला गरज नाही, संजय राऊतांची टीका

दरम्यान, संभाजी भिडे हे हिंदुत्ववादी विचारसणीचे असल्याने ते संघ आणि भाजपचे निकटवर्तीय असल्याचे मानले जातात. परंतु त्याचेवेळी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांना फारसा विरोध केला नाही, असा आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी उघडपणे संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर केलेल्या टीकेची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

‘फडणवीसांच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता’, संजय राऊतांचा टोला

काय म्हणाले होते संभाजी भिडे ?
देशात सर्वत्र सुरु असलेल्या खेळखंडोबाला केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही जबाबदार आहेत. कोरोना हा रोगच अस्तित्वात नाही. ज्याचे त्याचे आयुष्य प्रत्येकाच्या स्वाधिन आहे. लोक स्वत:च्या आरोग्याबाबत पाहून घेतील. सरकारने या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही. हातावरची पोटं असलेली किती लोकं या लॉकडाऊनमध्ये मेली. किती लोक बेरोजगार झाले. याची फिकीर कोणाला नाही. रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांना लाठीने मारले जाते आणि दारुच्या दुकानात गर्दी करणाऱ्यांना सोडले जाते. सर्व व्यापार बंद ठेवून दारुची दुकाने सुरु ठेवता, हा काय प्रकार आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिले पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही.

देशात सर्वत्र बावळट, नेभळट प्रजा असल्यामुळे कोरोनाचा आक्रोश सुरु आहे. लॉकडाऊनची गरज नाही. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्या, आणि सरकारने त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा. दारु, मावा, मटका, चरस, गांजा सर्व मोकाट, आणि एकत्र येऊन मुलांनी खेळायचे नाही. व्यायाम करायचा नाही हा महामुर्खपणा आहे. मास्क लावण्याने काहीही होत नाही. त्यामुळे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही.

गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवर मास्क लावण्याचा हा नालायक सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची काही गरज नाही. मास्क नसेल तर पोलीस काठी मारतात. हा सगळा मूर्खपणा आहे. लष्करी जवानांना मास्क घालून लढायला सांगायचे का, जिथे मरण्यासाठी लढायचे आहे, तिथे मास्कची गरज नाही, असेही संभाजी भिडे म्हणाले.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts