IMPIMP

प्रकाश जावडेकरांच्या ‘ज्ञानामृता’ची महाराष्ट्राला गरज नाही, संजय राऊतांची टीका

by Team Deccan Express
shiv sena sanjay raut slams bjp prakash javadekar over vaccine shortage coronavirus maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – संजय राऊत Sanjay Raut यांनी आज (रविवार) सकाळी माध्यमांशी बोलताना प्रकाश जावडेकर यांच्यावर निशाणा साधला. प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची राज्याला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्रात यावं, मुंबई-पुण्यात बसावं, इथली परिस्थिती बघावी. त्यांचंही महाराष्ट्राशी नातं आहे, अशी टीका राऊत यांनी केली. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत Sanjay Raut यांनी देशातील आणि राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधून विरोधकांवर टीका केली आहे.

गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र, राज्यातील जनतेचं म्हणणं असल्याच सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लॉकडाऊनला विरोध केला आहे. यावरुन त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लॉकडाऊनला विरोध केला आहे. ती त्यांच्या पक्षाची राज्यापुरती भूमिका आहे. देशातील भूमिका वेगळी असू शकते. जर मोदींनी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला तर, देवेंद्र फडणवीस मोदींना म्हणतील का की महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, अशी त्यांची भूमिका असेल का ? असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

‘फडणवीसांच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता’, संजय राऊतांचा टोला

देशातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर
संजय राऊत यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, सध्या देशांतर्गत युद्ध आहे. सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी कोरोनाग्रस्त आहेत, याची माहिती फडणवीस यांना असेल. मोठ्या व्यक्ती, महाराष्ट्रातील जनता कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राचे म्हणून एकत्र आले पाहिजेत. आपल्याला कोरोना होणार नाही आणि विरोधकांनाच तो होईल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी डोक्यातून पहिले काढून टाकले पाहिजे. देशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातील परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य सर्वांना समजावून सांगत लॉकडाऊनचे संकेत दिल्याचे राऊत Sanjay Raut यांनी सांगितले.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

 

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

 

Related Posts