IMPIMP

Jayant Patil | जयंत पाटलांचे मोठे विधान; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता, त्यामुळेच…’

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil reaction to jayant patil statement

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना ‘व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी’, असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि इतर भाजप नेते (BJP leader) उपस्थित होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत (Join Shivsena) येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु झाली आहे.

जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता असून तशी गडबड मला दोन दिवसात दिसत आहे.
त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही,
असेही पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थिर असल्याचे सांगताना कोणतेही मतभेद नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
भाजप नेते दोन वर्षापासून असंच बोलत असून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Web Titel :-  Jayant Patil | ncp jayant patil bjp raosaheb danve chandrakant patil shivsena uddhav thackeray

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा 

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून कोटयावधीचं सोनं चोरणार्‍या 2 महिला अन् लहान मुलगा CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

Chandrakant Patil | ‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्याची चुकीची क्लिप व्हायरल, चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडीओ)

Social Media Posts | सोशल मीडियावरून मिळू शकते घसघशीत पगाराची नोकरी, फक्त पोस्टमध्ये करू नका ‘या’ 5 चूका; जाणून घ्या

Related Posts