IMPIMP

Kirit Somaiya | आयएनएस विक्रांत प्रकरणावर सोमय्यांचा सवाल; म्हणाले – ’58 कोटींचा आकडा कुठून आणला उद्धव ठाकरेंनी सांगावं’

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत (INS Vikrant Funds) वरून जोरदार आरोप केले होते. या ओरोपांवर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी आज (गुरुवारी) थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. “मला पोलिसांकडून FIR कॉपी उशिरा मिळाली. कॉपी वाचली तुम्हालाही हसू येईल. 58 कोटींचा आकडा आणला कुठून हे उद्धव ठाकरेंनी सांगावं”, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते मुंबईत (Mumbai News) माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, ”आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) प्रकरणावर पोलिसांनी दाखल केलेली एफआयआरची कॉपीच मला उशिरा मिळाली. ते कॉपी द्यायला मागत नव्हते. ती कॉपी जर तुम्ही वाचली तर हसू येईल. ज्या नागरिकाने तक्रार केली आहे. त्याने एका बातमीत वाचलं की आयएनएस विक्रांतसाठी 58 कोटी जमा केले. या आधारावर पोलिसांनी मला कोणतीही कल्पना न देता थेट 420 चा गुन्हा कसा काय दाखल केला?”, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.

 

 

पुढे सोमय्या म्हणाले, “माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर मला हसू येतं. जर तुम्ही आरोप करत आहात.
तर त्याची कागदपत्रं का देत नाही ? 58 कोटी हा आकडा आणला कुठून हे उद्धव ठाकरेंनी सांगावं.
प्रत्यक्षात दीडदमडीचाही घोटाळा झालेला नाही,” असं देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Factory) शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा यासाठी कारखान्याच्या काही सदस्यांसह किरीट सोमय्या आज (गुरुवारी) ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले होते.
ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“अजित पवारांचा (Ajit Pawar) जर जरंडेश्वर कारखान्याशी संबंध नाही मग ते बोलतात कशाला?”,
असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी आयएनएस विक्रांत या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला.

 

 

Web Title : Kirit Somaiya | CM uddhav thackeray should tell where he got the figure of 58 crores says kirit somaiya about ins vikrant case

 

हे देखील वाचा :

Beed Crime | पत्नी अन् तिच्या प्रियकराने धमकावले ! पुण्यातील PMPML बस चालकाची परळीत आत्महत्या

Corporator Sainath Babar | मनसेच्या शहर अध्यक्षस्थानी साईनाथ बाबर यांची नियुक्ती; वसंत मोरे यांना हटवले

Pune Crime | PLAYBOY होण्याच्या नादात तरुणाने गमावले 17 लाख ! वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावला

 

Related Posts