IMPIMP

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

by pranjalishirish
litmus test of alliance government will be held in pandharpur by election

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पंढरपूरचे pandharpur राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 17 एप्रिल रोज पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे  सरकार Mahavikas Aghadi  आल्यानंतर प्रथमच राज्यातील विधानसभेची पहिली पोट निवडणुक होत आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कारभाराची लिटमस चाचणी Litmus test होणार आहे. त्यामुळे ही निवडणुक महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची तर विरोधी भाजपचे अस्थित्व सिध्द करणारी आहे. त्यामुळे 2 मेच्या येथील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

भारत भालकेंच्या पत्नी जयश्री भालकेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर विरोधी भाजपकडूनही महिला उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये भाजपकडून आमदार प्रशांत परिचारकांच्या कट्टर समर्थक पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे नाव आघाडीवर आहे.

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रकरण

शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या सदस्या शिला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांनीही महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. महाविकास आघाडीने Mahavikas Aghadi उमेदवारी नाकारली तर अपक्ष निवडणुक लढणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. पंढरपूरच्या pandharpur पोटनिवडणुकीत भालके, भोसले आणि गोडसे अशी तिरंग लढत होण्याची अधिक शक्यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे.

Also Read : 

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

Related Posts