IMPIMP

‘परमबीर सिंह आणि वाझे यांचे BOSS कोण?’

by bali123
nitesh rane attack on cm uddhav thackeray over sachin vaze case

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाईन – सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते आमदार नितेश राणे nitesh rane यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जेंव्हा अटक झाली तेंव्हा संजय राऊत यांच्या भावाच्या भांडूप येथील कार्यालयाबाहेर वाझेंची काळ्या रंगाची मर्सिडिज सकाळी काय करत होती? याचे उत्तर संजय राऊतांनी द्यावे, असा गंभीर आरोप राणेंनी nitesh rane केला आहे.

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

सचिन वाझे प्रकरणामुळे भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. यावरून आमदार राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. वाझे आणि परमबीर सिंह फक्त हे प्यादे आहेत. ते खरे सूत्रधार नाहीत. 2014 आणि 2019 मध्ये जेंव्हा शिवसेना- भाजपचे सरकार होते. त्यावेळी ठाकरेंनी वाझेंना परत घ्या म्हणून फडणवीसांकडे आग्रह धरला होता. आता झालेल्या अधिवेशनात वाझेंना निलंबित करण्यासाठी तयार नव्हते. मुख्यमंत्री ठाकरे त्यांची वकिली करत होते. त्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की, वाझे आणि परमबीर सिंह यांचा बॉस कोण आहे. राजकीय आशीर्वाद कोणाचा होता हे आता स्पष्ट झाल्याचे  राणेंनी म्हटले आहे. जर या दोघांची बदली होत असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राणेंनी केली आहे.  एनआयए ही देशातील सर्वोच्च तपासयंत्रणा आहे. त्यामुळे  वाझे कोणासाठी पब्लिसीटी करत होते? ती सगळी माहिती त्यांनी दिली असून फक्त ती आता टप्प्याटप्याने बाहेर येईल. पण वाझे हे फार छोटे आहेत त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

 

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

 

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts