IMPIMP

‘मी जीव द्यायला जातेय’ ! भाजपच्या ‘या’ खासदाराच्या सुनेनं हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

by pranjalishirish
lucknow-firing-case-bjp-mp-kaushal-kishore-daughter-law-suicide-attempt

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे BJP खासदार कौशल किशोर Kaushal Kishore यांच्या सुनेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कौशल किशोर Kaushal Kishore हे लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. कौशल किशोर यांची सून अंकिता यांनी कौशल किशोर यांच्या घराबाहेर आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने अंकिता यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी “मी जीव द्यायला जातेय” असे म्हटले आहे.

अंकिता यांनी आपले पती आयुष यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. अंकिता यांनी आपल्या व्हिडिओमध्ये आत्महत्या करायला जात असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर त्या आपल्या स्कूटीने खासदारांच्या दुबग्गा येथील घरी गेल्या आणि तिथे त्यांनी आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अंकिता यांनी आपल्या व्हिडिओमध्ये “मी कोणासोबत लढू शकत नाही कारण तुमचे वडील हे खासदार आहेत. माझं कोणीच ऐकणार नाही. आजपर्यंत कोणीच तुम्हाला हात लावला नाही. मग मी कशी तुम्हाला मारू शकते” असे म्हटले आहे.

अंकिता यांनी काय म्हटले आहे व्हिडिओमध्ये ?

अंकिता यांनी “तुम्ही किती खोटं बोलत आहात. तुम्ही आणि तुमच्या घरचे मला जगू देत नाहीत. घराचं भाडं भरलं नाही, सिलिंडर नाही, मी काय खात असेल याचा कधी विचार केला का?, जर तुम्ही माझ्य़ाकडे येणार नसाल तर मला राहायचंदेखील नाही. मी जातेय. तुम्ही नेहमीच माझी आठवण काढाल. माझ्या मृत्यूचं कारण तुम्ही आणि तुमच्या घरचे आहेत. मी जाते आहे” असे आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. याच्या अगोदर अंकिता यांनी आपला पती आयुषच्या नार्को टेस्टची तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष किशोर Kaushal Kishore याच्यावर काही अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आयुषच्या मेहुण्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता, आयुष याने स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतला होता, असा धक्कदायक खुलासा केला आहे. या गोळीबाराच्या प्रकरणात पाच – सहा जणांना अडकवण्यासाठी त्याने हा कट रचल्याचे समोर आले आहे. आयुष किशोर याच्या मेहुण्याचे नाव आदर्श असून, त्यानेच हा गोळीबार केल्याचे मान्य केले आहे. तसेच त्यांनी काही लोकांची नावेदेखील सांगितले आहेत. “आयुषने पाच – सहा लोकांना अडकवण्यासाठी हा कट रचला होता. चंदन गुप्ता, मनीष जयस्वाल आणि प्रदीप कुमार सिंह यांच्यासोबत आणखी दोन जण होते, परंतु त्यांची नावं मला माहीत नाहीत. तसेच आयुषच्या सांगण्यावरून मी फक्त समोरून गोळी झाडली होती,” अशी माहिती आदर्श याने दिली आहे.

मुलगा आयुषने प्रेमविवाह केल्यानंतर आपण त्याच्याशी सगळे संबंध तोडले होते, तसेच त्याने आपल्याला आत्महत्येची धमकीसुद्धा दिली होती, अशी माहिती मोहनलालगंजचे भाजप खासदार कौशल किशोर यांनी दिली आहे. यानंतर आयुष आपल्या नाराज कुटुंबीयांपासून वेगळा राहत होता. या गोळीबारानंतर आयुषला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांना आयुषची पत्नी आणि मेहुण्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी आयुषचा मेहुणा आदर्श याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यनंतर सगळं सत्य समोर आले.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटी

Related Posts