IMPIMP

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

by pranjalishirish
maharashtra politics anil deshmukh defend ncp sharad pawar congress shiv sena bjp uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन–  मुंबईमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलियाच्या जवळ सापडलेल्या स्फोटकाने भरलेल्या कारच्या तपासात होत असलेल्या खुलाशाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकार्‍याला दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणावरून कालपर्यंत चौकशीचे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार Sharad Pawar  आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचे समर्थन उघडपणे करत आहेत आणि क्लीन चिट देत आहेत. पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, जे आरोप त्यांच्यावर करण्यात आले झाले आहेत त्यामध्ये काहीही दम नाही. अशावेळी प्रश्न हा उपस्थित होतो की, अखेर अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार ढाल बनून समोर का उभे राहिले आहेत?

सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन बिघडल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस; काँग्रेसची टीका

शरद पवार Sharad Pawar यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आपले नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नाही. राष्ट्रवादी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्याने अशाप्रकारचे आरोप ते करत आहेत आणि भाजपासोबत मिळून कट रचत आहेत. इतकेच नव्हे, पवार यांनी म्हटले की, ज्या तारखेचा संदर्भ देऊन आरोप केले आहेत, त्यावेळी 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे हॉस्पीटलमध्ये दाखल होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांना विचारण्यात आले की, शिवसेनेने जर टिक टॉक स्टार पूजा चौहाणच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपले मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेऊ शकते तर अशाच प्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी असे का करत नाही. हा प्रश्न टाळत त्यांनी म्हटले की, ज्या अधिकार्‍याने हा आरोप केला आहे तो स्वत: संशयाच्या फेर्‍यात आहे. यावरून स्पष्ट होते की, एनसीपीने ठरवले आहे की, ते अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नाहीत. हेच कारण आहे की, शरद पवार संपूर्ण घटनाक्रमाला राजकीय षडयंत्र असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करताना दिसले आणि सोबतच कालपर्यंत चौकशीबाबत बोलणारे शरद पवार सोमवारी गृहमंत्र्याना क्लीन चिट देताना दिसले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांना कोरोनाचा संसर्ग

तर, काँग्रेस नेते महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे, कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर चर्चा करतील. इतकेच नव्हे, त्यांनी म्हटले की, शरद पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही राजीनाम्यावर विचार करत आहोत, जो सुद्धा पर्याय असेल आम्ही विचार करू. अनिल देशमुख यांचा राजीनामा सुद्धा एक पर्याय आहे, ज्यावर मुख्यमंत्री लवकरात लवकर निर्णय घेतील. राष्ट्रवादीवर सहकारी पक्षांचा सुद्धा दबाव वाढत आहे, परंतु पवार मजबूतीसह देशमुख यांच्या सोबत उभे आहेत.

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

देशमुख यांच्या राजीनाम्यासह घसरेल एनसीपी?

उद्धव ठाकरे सरकारमधून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देताच संपूर्ण प्रकरणाचा ठपका एनसीपीवर येईल. एवढेच नव्हे, यामुळे हे सुद्धा स्पष्ट होईल की संपूर्ण घटनाक्रमात अनिल देशमुख यांचा हात आहे. याचा कारणामुळे, शरद पवार स्वत: पुढे येऊन अनिल देशमुख यांचा बचाव करत आहेत आणि सोबतच हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, हे संपूर्ण प्रकरण एक राजकीय षडयंत्र आहे, जे भाजपाने परमबीर सिंग यांच्यासोबत मिळून रचले आहे. अशाप्रकारे संपूर्ण घटनाक्रमास पवार यांनी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

विदर्भात एनसीपीचा चेहरा मानले जातात देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख महाराष्ट्राच्या विदर्भातील आहेत. ते नागपुर जिल्ह्याच्या वाडविहिरा गावातील आहेत. त्यांनी 1995 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकली होती. देवेंद्र फडणवीस सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ सोडला तर लागोपाठ प्रत्येक सरकारमध्ये देशमुख हे मंत्री होते. राजकीय विश्लेषकांनुसार, एनसीपीने विदर्भात पक्षाच्या विस्ताराच्या हेतूनेच त्यांना गृह सारखे महत्वाचे मंत्रालय सोपवले जेणेकरून विदर्भाला राजकीय संदेश दिला जाऊ शकतो. फडणवीस यांच्यापासून नितीन गडकरी यांच्यासारखे भाजपा नेते याच भागातून येतात आणि हा भाजपाचा मजबूत गड बनत होता, ज्यामध्ये एनसीपीने आपले ताकद दाखवण्याच्या रणनिती अंतर्गत अनिल देशमुख यांना पुढे आणले.

…म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना कोरोना होत नाही, भाजप आमदाराचे अजब विधान

शरद पवार यांचे डोळे-नाक आहेत देशमुख

अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार Sharad Pawar यांच्यासह सुप्रिया सुळे यांचे सुद्धा निकटवर्तीय नेते मानले जातात. मागील वर्षी अजित पवार यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी केली होती, तेव्हा त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांनाच पुढे केले होते. एवढेच नव्हे, उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा अनिल देशमुख यांचे नाव खुप चर्चेत होते, परंतु अजित पवार यांच्या परतीनंतर त्यांना हे पद मिळू शकले नव्हते. परंतु शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना गृहमंत्री बनवून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून अजित पवार यांच्याएवढाच त्यांचा प्रभाव रहावा. असे समजले जाते की, अनिल देशमुख शरद पवार यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत. यामुळेच गृह मंत्रालयावर शरद पवार यांचे वर्चस्व कायम राहिले आणि यासाठी त्यांच्या बचावासाठी ते उभे असल्याचे दिसत आहे.

Sudhir Mungantiwar : ‘मुंबई पोलिसांना आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल’

अनिल देशमुख यांनी अशी केली मजूबत पकड

नागपुरमध्ये वाढलेले अनिल देशमुख यांनी 1970 च्या दशकात राजकारणात पाऊल ठेवले होते. पहिल्यांदा 1992 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि विजय मिळवला. येथूनच त्यांनी महाराष्ट्रच्या राजकारणात आपली ओळख निर्माण करण्यास सुरूवात केली. त्यांनी आपल्या वाढत्या लोकप्रीयतेच्या बळावर 1995 मध्ये काँग्रेस पक्षाकडून तिकिट मागितले, परंतु पक्षाने तिकिट न दिल्याने ते अपक्ष उमेदवार म्हणून लढले आणि जिंकले सुद्धा. शिवसेना-भाजपा आघाडी सरकारला पाठिंबा देऊन 1995 मध्ये प्राथमिक शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री बनले.

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश

शरद पवार Sharad Pawar यांनी जेव्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसह अनिल देशमुख सुद्धा पक्षात आले. 1999 मध्ये ते एनसीपीच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक जिंकले. 2004 मध्ये तिसर्‍यांदा काटोलमधून निवडणूक जिंकून त्यांनी विजयाची हॅट्रिक केली. अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात अनिल देशमुख यांनी आपली जबरदस्त पकड मजबूत केली आणि सोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि गृह मंत्रालय सुद्धा सांभाळले. हेच कारण आहे की अनिल देशमुख यांना वाचवण्यासाठी शरद पवार यांनी सर्व डाव टाकले आहेत.

‘मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरे आता तरी प्रायश्चित्त करणार का?

तर, दुसरीकडे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, भाजपाला लाज वाटली पाहिजे, जे अशाप्रकारच्या घोषणा देत आहेत. महाराष्ट्रात पहाटे शपथ ग्रहण करण्यापासून हाथरसमध्ये तरूणीला जाळणे आणि उत्तर प्रदेशात साधुंच्या हत्येसाठी भाजपाने थोडी लाज बाळगावी. महाराष्ट्रात झालेल्या घटनेचा एनआयए तपास करत आहे तर काय अडचण आहे. सीबीआयच्या केसचे काय झाले? सुशांत प्रकरणात सुद्धा तुम्ही महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पुढे त्याचे काय झाले. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे हे काम भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत.

Also Read : 

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

‘अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली’, परमबीर सिंग यांच्या ‘त्या’ 100 कोटींच्या लेटरमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

Related Posts