IMPIMP

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

by pranjalishirish
maharashtra vaccine war of words over vaccines shiv sena leader sanjay raut harsh vardhan prakash javadekar devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना प्रतिबंध लस यावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्यात राजकारण चांगलच तापल्याचं दिसत आहे. राज्यात लसीचा पुरवठा कमी असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद केले आहे. लसीच्या या कारणावरून शिवसेनेने Shiv Sena केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. याच अनुषंगाने शिवसेनेने Shiv Sena सामान अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

लस वाटपाच्या मुद्यावरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात परस्पर आरोपप्रत्यारोप सुरु आहे. तर पुण्यातील (केंद्रीय मंत्री) प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे. करोना संकटाची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. भारतात कोरोना लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत पंतप्रधान मोदीच घेत होते हे जावडेकर विसरलेले दिसतात. पंतप्रधानांनी कोविडबाबत जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्र राज्याने केली आहे. म्हणजेच प्रकाश जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरलेला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तर राज्याची ‘लसी’ च्या बाबतीत न्याय मागणी लाथाडण्याचाच प्रयत्न केला व आरोग्यविषयक गंभीर स्थितीत ‘वसुलीबाज’ वगैरे शब्द वापरून राजकारण किती ‘##’ पद्धतीने सुरू आहे ते दाखवून दिलं,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलीय.

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात लसीची आणीबाणी सुरू झाली आहे ती केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणानं. भाजपशासित राज्यांना अधिकाधिक लस साठा पुरवला गेला आहे. उत्तर प्रदेशला ४४ लाख डोस, मध्य प्रदेशला ३३ लाख डोस, गुजरातला १६ लाख, कर्नाटक २३ लाख, हरयाणा २४ लाख, झारखंड २० लाख आणि महाराष्ट्राच्या वाट्याला रडतखडत कसेबसे १७ लाख डोस आले. महाराष्ट्राची लोकसंख्या व करोना संक्रमणाची तीव्रता सगळ्यात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही. महाराष्ट्रात माणसे राहात नाहीत असे केंद्राला वाटते काय ? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवता येत नसल्याने लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लोकांत असंतोष भडकवायचा असे तर कारस्थान कोणाच्या डोक्यात शिजत नसावे ना ?,अशी शंका सुद्धा शिवसेनेने Shiv Sena सामना अग्रलेखातून मांडली आहे.

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

तसेच, सामनामधून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे, करोना हा मानवनिर्मित की दैवी कोप ? यावर बरेच वाद झाले, मात्र सांगलीचे शिवभक्त भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. परंतु, सांगलीचे शिवभक्त अवलिया संभाजी भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘जे ‘##’ आहेत त्यांना करोना होणारच. करोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत, असे विचार सांगलीच्या या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील. राज्यात व देशात करोना अनेक भल्याभल्यांना झाला. अर्थात जे मेले ते मरायच्याच लायकीचे आणि ज्यांना करोना झाला ते ‘##’ ! संभाजी भिडे गुरुजीही संघ विचाराचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. ‘मास्क’ वगैरे लावू नका, असे विचारही त्यांनी मांडले आहे. असे सामना मधून म्हटले आहे.

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुढे त्यामध्ये म्हटले, भारताचे पंतप्रधान काय करणार ? खरे तर आज प्रभू श्रीराम, विष्णू इतकेच काय, छत्रपती शिवरायांनाही मास्क लावूनच सिंहासनावर बसावे लागले असते. करोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. परंतु, संकटाचे भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती राज्याच्या परंपरेस शोभणारी नाही. राज्यात करोना लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आणि यामागे महाराष्ट्र राज्याला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. राज्याची जनता म्हणजे टिनपाट किंवा ‘##’ ची अवलाद असा समज केंद्राने अलीकडच्या काळात करून घेतला असेल तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण आहे. संभाजी भिडे यांनी करोनाग्रस्तांना ‘##’ म्हटले. त्याऐवजी लसीचे राजकारण करणाऱ्यांना या ‘##गिरी’ चा फटका मारला असता तर शिवरायांचे नाव राहिले असते, असे सामनामधून भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read More : 

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Related Posts