IMPIMP

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

by pranjalishirish
maharashtra will not stop so why did appointments stop mpsc student ask cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले. मात्र स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना म्हटले होते की, महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… या त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत एमपीएससी (MPSC) पास झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारला ट्विट करुन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. परीक्षा पास होऊन देखील अद्याप नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी नियुक्त्या कधी असा सवाल सरकारला विचारला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ट्विटरवर #MPSC_2019_Joining हा हॅशटॅग वापरुन सरकारविरोधात एक मोहिम सुरु केली आहे.

एमपीएससी परीक्षा पास झालेल्या अधिकाऱ्यांची सध्या केवीलवाणी अवस्था झाली आहे. नियुक्तीचा सवाल रोजचा झाला आहे, कधी गावात तर कधी गावाबाहेर आहे.. अशी भावना नायब तहसीलदार बनलेल्या पण नियुक्ती मिळाळी नसल्याने शेतात राबणाऱ्या प्रवीण कोटकर यांनी व्यक्त केली आहे. मात्र हा प्रश्न एकट्या प्रवीण यांचा नाही तर 2020 च्या बॅचमधील 413 प्रवीण यांचा आहे. 413 अधिकारी सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी 8 वर्षे संघर्ष केला. मात्र, यश मिळाल्यानंतर 10 महिने उलटून गेले तरी अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कोणाला तेंड लपवून घरात बसावे लागत आहे, तर कुणाला घरची परिस्थिती नसल्याने शेतात मजूरी करावी लागत आहे.

प्रविण कोटकर यांनी सांगितले की, साहेब कधी होणार जॉईनींग, रावसाहेब कुठलं गाव मिळालं, खरंच तहसीलदार झाला का वो ? आता हे शब्द टोचू लागले आहेत. गावातून बाहेर फिरताना कोणी समोर येईल अन् आपल्यावर हसेल हे सांगता येत नाही. त्यामुळे दिवसभर शेतात जाऊन राबतोय, शेतातली सगळी काम करतोय. घरची परिस्थिती जेमतेम आहे. आई-वडील दोघेही अल्पशिक्षित आहेत. मुलाने इंजिनिअर व्हावे हे स्वप्न बाळगून त्यांनी मला शिकवलं, असे प्रवीण कोटकर यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावचा प्रवीण नायब तहसीलदार बनला आहे. मात्र, सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे.

रिक्षावाल्या भावाने मदत केलेल्या अल्पसंख्याक समाजातील वसिमा शेख यांनी प्रतिकुल परिस्थितीत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. तर वंदना करखेले यांनी डीवायएसपी झाल्या. या आनंदात त्यांनी पहिल्या नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, 10 महिन्यापासून नियुक्ती नसल्याने तेल ही गेलं अन् तूपही… आता घरी बसण्याची वेळ आलीय. बेटी बचाव-बेटी पढाव म्हणणाऱ्या सरकारने बेटी को जॉइनिंग दो… अस म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

शासनाकडून झालेल्या दिरंगाईचा फटका आम्हाला बसला आहे. जून ते सप्टेंबर या काळात नियुक्ती दिली असती तर कोणतीच अडचण नव्हती. आता तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसईबीसी प्रवर्ग वगळून उर्वरित अधिकाऱ्यांना सरकार नियुक्ती देऊ शकते. मात्र, सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे 365 भावी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही… माग आमची नियुक्ती का थांबली ? असा सवाल विकास शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना uddhav thackeray विचारला आहे. विकास शिंदे यांनी #MPSC_2019_Joining ही ट्विटर मोहिम सुरु केली आहे. विकास शिंदे यांच्या प्रमाणेच मयुर राऊत यांनी देखील असाच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

 

 

 

तलाठी पदाच्याही नियुक्त्या रखडल्या

एमपीएससी प्रमाणेच तलाठी पदांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. तलाठी या क वर्गातील पदासाठी मार्च 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षे झाली तरी अद्याप नियुक्त्या नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नांदेड, बीड, औरंगाबाद, सातार, सोलापूर आणि विदर्भातील जवळपास 350 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, असे नव्याने तलाठी बनलेल्या प्रशांत नलावडे यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेत पास होऊन देखील अधिकारी बनलेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. याप्रकरणी सरकारला गांभीर्य नसल्याची भावना उमेदवारांकडून बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे खरचं सरकार गंभीर होणार का, या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणार का ? असा सवाल मुलांच्या आई-वडीलांनी केला असून सरकार याकडे कशा पद्धतीने पाहते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

Related Posts