IMPIMP

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

by pranjalishirish
mahavasuli government not mahavikas aghadi government says devendra fadnavis

मंगळवेढा : सरकारसत्ता ऑनलाइन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आता देशमुख यांना राजीनामा द्यायला लागला होता. त्यानंतर याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला टोला लगावला. ‘गेल्या दीड वर्षात या सरकारचे नाव बदलून महावसूली आघाडी नाव झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ, अशी या सरकारमधील मंत्र्यांची कामे आहेत’, असे ते म्हणाले.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. आवताडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या फडणवीस  Devendra Fadnavis यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘बांधावर जाऊन सांगणारे मुख्यमंत्री हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळवून देऊ पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पद्धतीने वीज बिलाची शेतकऱ्यांकडून वसूली केली. लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते त्यांना दुप्पट बिले देऊन आपली तिजोरी भरली’.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

तसेच निवडणूक आली की कोणता तरी बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली आहेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही. कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही, असेही ते म्हणाले.

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

महाराष्ट्रात लोकशाही नाहीतर ‘लॉक’शाही

शेतकऱ्यांकडून, पोलिसांकडून आणि जनतेकडून वसूली करण्यासाठी सरकार काम करत आहे. महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असले तरी जेव्हा लॉकडाऊन करतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य लोकांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे, असेही फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले.

Read More : 

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Related Posts