IMPIMP

राज ठाकरे भडकले, म्हणाले- ‘मंत्री गर्दी करून धुडगूस घालतोय आणि शिव जयंती, मराठी भाषा दिनाला नकार’

by sikandershaikh
raj thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Language Day) मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena – MNS) वतीनं मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोना (COVID-19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना गर्दी नाकारली. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. मंत्री गर्दी करून धुडगूस घालतोय आणि शिव जयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देत आहे. कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल तर निवडणुकाही पुढं ढकलाव्यात असं ठाकरे म्हणाले आहेत.

दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या मराठी स्वाक्षरी मोहिम कार्यक्रमानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, खरं तर त्यांच्या मनात आहे की नाही, फक्त आपलं संभाजीनगर सारखं करायचं. अशा प्रकारे दिवस आल्यानंतरच सरकारला जाग का येते. त्यांना असं बोलावं का वाटतं. इतकी वर्षे त्यांच्या हातात सरकार आहे. मग का होत नाहीत या गोष्टी. या मुद्द्यात राजकारण कसलं. इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर होईल.

https://twitter.com/RajThackeray/status/1365509727392702465?s=20

मराठी स्वाक्षरी मोहिम कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले,
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सर्व कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते.
सरकारमधील जे मंत्री आहेत किंवा इतर लोकं आहेत ते गर्दी करून धुडगूस घालू शकतात.
शिवजयंतीला परवानगी नाकारता. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला नकार देता.
कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल तर निवडणुकाही पुढं ढकलाव्यात.
ज्या आता जाहीर करण्यात आल्या त्या एका वर्षानंतर घ्या.
काही फरक पडत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी नियमालीवरून सरकारला फटकारलं.

 

Related Posts