IMPIMP

MLA Pratap Sarnaik । ‘भाजप सोबत जुळवून घ्या’ म्हणत चर्चेत असणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक प्रथमच मीडियासमोर

by bali123
Pratap Sarnaik | sachin sawant targeted pratap sarnaik due to ed action

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) MLA Pratap Sarnaik । मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) रडारवर असणारे शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) हे आज विधिमंडळात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी भाजपसोबत (BJP) जुळवून घेण्याची मागणी करणारे प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) चांगलेच चर्चेत आले आहेत. मागील अनेक महिने प्रताप सरनाईक हे विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रमापासून बाजूला झाले होते. मात्र, आज (सोमवारी) सरनाईक हे प्रथमच मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘या देशात किंवा कुठेही माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा तक्रार नाही. कोणीही माझ्याविरोधात जबाब दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) संरक्षण दिलं आहे. ईडीच्या कारवाईमुळे मी गायब झालो असं नाही. माझ्यावर हृदयरोगाची शस्त्रक्रिया झालीय आणि माझी पत्नीही कर्करोगामुळं आजारी आहे. त्यामुळे मी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘मी काही विजय माल्या किंवा नीरव मोदी नाही जो गायब होणार किंवा बाहेर जाणार. कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार असं नाही. अधिवेशनाला सर्व आमदारांनी हजर राहण्याच्या सूचना पक्षानं दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार आज मी विधिमंडळात हजर झालो आहे,’ असे त्यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांची अंमलबजावणी संचालनालया (ED) कडून
चौकशी सुरु आहे. ईडीच्या कारवाईवरुन सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav
Thackeray) यांना पत्र लिहून भारतीय जनता पार्टीची (BJP) सोबत जुळवून घेण्याची मागणी
केली होती. त्यामुळे सरनाईक पुन्हा चर्चेत आले होते. प्रताप सरनाईक अज्ञातवासात असल्याने
विरोधकांनी देखील त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर सरनाईक हे आज विधानभवनात दाखल झाले आहे. आणि माध्यमाशी सवांद साधला आहे. त्यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे.

Web Titel : MLA Pratap Saranaik । money laundering case shiv sena mla pratap sarnaik reaction on ed

Related Posts