IMPIMP

Gopichand Padalkar | ‘रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात’, पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका (व्हिडिओ)

by bali123
Gopichand Padalkar | sharad pawar betrayed the bahujans criticism of gopichand padalkar

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे. सोलापुरमध्ये (Solapur) पत्रकारांशी बोलताना पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्लीत (Delhi) हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असे झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar criticizes sharad pawar on delhi meeting

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी तिसऱ्या आघाडीवरुन शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी लहान असल्यापासून ऐकतो आहे शरद पवार पंतप्रधान (Prime Minister) होणार. मागील 30 वर्षापासून ते भावी पंतप्रधान (future Prime Minister) आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी (PM) शुभेच्छा आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.

काही कोंबडे दिल्लीत एकत्र जमले

पडळकर पुढे म्हणाले, साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर यांची पार्टी नाही. काही जणांना वाटते की, कोंबडं आरवल्याशिवाय उजाडत नाही. असेच काही कोंबडे दिल्लीत (Delhi) एकत्र जमले होते. त्यामुळे त्याचं असं झालंय की, रात गेली हिशेबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळे पुढे कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

मला संस्कार शिकवण्याची गरज नाही

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या शरयू देशमुख (Sharu Deshmukh) यांनी गोपीचंद पडळकर  यांच्यावर टीका केली होती. पात्रतेपेक्षा जास्त भेटलं की असं होतं, असं म्हणत शरयू देशमुख (Sharu Deshmukh) यांनी पडळकरांना संस्कार शिकवले होते. यावर बोलताना पडळकर म्हणाले, राज्यातील काही घराणे हे अतिसुसंस्कृत आहेत. मी एका शिक्षकाचा मुलगा (son of teacher) आहे. तुमच्या विरोधात बोललो की लगेच असंस्कृतपणा दिसतो. त्यामुळे मला संस्कार शिकवण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले.

Web Title : Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar criticizes sharad pawar on delhi meeting

Related Posts