IMPIMP

MLA Sanjay Gaikwad । शिवसेना आमदाराचं विवादास्पद वक्तव्य, म्हणाले – ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज, 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र पुरवतो’

by bali123
 Sanjay Gaikwad | sanjay raut would trampled by balasaheb thackeray sanjay gaikwad statement viral video

बुलडाणा : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Sanjay Gaikwad | शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी एक विवादास्पद भाष्य केलं आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा (Atrocity) धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तर, गावांत असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच दहा हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करु, असं वादंग वक्तव्य बुलडाण्याचे आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं आहे. MLA Sanjay Gaikwad | shivsena buldhana mla sanjay gaikawad controvercial statement over  atrocity act

काय म्हणाले संजय गायकवाड?

याबाबत सविस्तर माहित अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वाघ कुटुंबावर 19 जूनला हल्ला झाला होता.
ॲट्रॉसिटीचा (Atrocity) धाक दाखवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश हिवराळे याने गावात उच्छाद मांडला आहे.
बुधवारी (30 जून) रोजी चितोडा गावाला आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, हल्ला झालेल्या वाघ कुटुंबाला आम्ही तुमच्यासोबत आहोत.
घाबरण्याची गरज नाही, असा त्यांनी धीर दिला.
तसंच बोलत बोलत आमदार गायकवाड यांनी एक विवादास्पद वक्तव्य केलंय.
भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः दहा हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा.
सगळी शस्‍त्र अस्‍त्र, सर्व ताकद पुरवीन, असं त्यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, ‘ॲट्रॉसिटी कायद्याचा कुणी धाक दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या.
खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना संघटित होऊन उत्तर द्या,
असं म्हणत चितोड्यात येण्याबाबत आपल्याला थेट ‘मातोश्री’वरून आदेश आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
तर, गावगुंडाचे समर्थन लोक करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
आपल्यावर कुणी अन्याय करत असेल तर आसपासच्या 25 गावांच्या तरुण पोरांची संघटित टीम बनवा. अन्याय होईल तेव्हा सर्व जण तुटून पडा. असं ते म्हणाले.

या दरम्यान, पुढे आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, ‘बिहार आणि उत्तर प्रदेशला लाजवणारा हा हल्ला आहे. गुंडगिरी या गावात फोफावली आहे.
ॲट्रॉसिटी हा कायदा रक्षणाकरिता आहे. परंतु, या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करता येथे केला जातो. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून पैसे उकळले जातात.
अवैधधंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात.
एक विशिष्ट समाज कमी संख्येने असल्याने आणि संघटित नसल्याने इथे सतत हल्ले होतात.
गेल्या एका प्रकरणामध्ये आत्महत्या केलेल्या युवकाच्या खिशात चिठ्ठी सापडूनही
गुन्हा दाखल झाला नाही. म्हणून पोत्याची दहशत तयार झाली आणि दुर्दैवाने सर्व समाजाने
देखीही त्याला साथ दिली आहे.

Web Title : MLA Sanjay Gaikwad | shivsena buldhana mla sanjay gaikawad controvercial statement over atrocity act

Related Posts