IMPIMP

Monsoon Season | अजित पवारांची मोठी घोषणा, 31 जुलै पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार

by bali123
Monsoon Season | vidhan sabha adhiveshan all mpsc vacancies will be filled july 31 2021 deputy cm ajit pawars big announcement

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Season) आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या ((Monsoon Season ) पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) हल्लाबोल केला. राज्यात मनमानी कारभार सुरु आहे, आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करु असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देवेंद्र फडणवीस यांनी आज पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच एमपीएससी परीक्षेचा (MPSC Exam) मुद्दा उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन (Swapnil Lonakar) राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधि एमपीएससीवर चर्चा करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावेळी स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली

31 जुलै पर्यंत रिक्त पदं भरणार

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्या सरकार एमपीएससी बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं
परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करत
आहे ? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. देवेद्र फडणवीस यांच्या मागणीवर उत्तर देताना
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त
जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.

Web Titel : Monsoon Season | vidhan sabha adhiveshan all mpsc vacancies will be filled july 31 2021 deputy cm ajit pawars big announcement

Related Posts