IMPIMP

MP Supriya Sule | महाआघाडीतील सर्व नेत्यांना टार्गेट केलं जातंय – सुप्रिया सुळे

by nagesh
MP Supriya Sule | due poor management modi government general public went bankrupt said mp supriya sule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   – MP Supriya Sule | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकनाट्यानंतर ईडी (ED) कडून शिवसेना नेते व परिवनहमंत्री अनिल परब (Anil Parab) यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना चौकशीसाठी उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केंद्र सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट महाआघाडीतील सर्व नेत्यांना टार्गेट केलं जातंय अशी टीका केंद्र सरकारवर केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

खासदार सुळे म्हणाल्या, ज्येष्ठ नेत्यांना आणि सर्वच मंत्र्यांना टार्गेट केल्याचे पहिल्यांदाच मी पाहत आहे. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलविल जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.असे त्यांनी म्हंटले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात
झालेल्या चर्चेबाबत प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडे अनेक मंत्र्यांची कामे असतात. मग ते विरोधी पक्षातले का होईना? आम्ही दोन्हीकडे राहिलो आहेत. त्यामुळं आम्हाला चांगलं माहीत आहे. एखाद्या विरोधी पक्षनेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर गैर काय?” असे म्हणत प्रतिप्रश्न केला.

 

Web Title : MP Supriya Sule | supriya sule gets angry after the action against anil parab said our leaders ministers

 

हे देखील वाचा :

Neelam Rane | नारायण राणेंच्या अटकेच्या कारवाईवर पत्नी नीलम राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

CoWIN | औरंगाबादमध्ये कोविन अ‍ॅप हॅक? महापालिकेची पोलिसात तक्रार

Pune News | दुर्देवी ! भरधाव PMPML बसच्या धडकेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

 

Related Posts