IMPIMP

CoWIN | औरंगाबादमध्ये कोविन अ‍ॅप हॅक? महापालिकेची पोलिसात तक्रार

by nagesh
Aadhaar Not Mandatory For Covid Vaccination | aadhaar not mandatory for covid vaccination you can use any one document out of 9

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन –  CoWIN | राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्यातच आता महिन्यातून तीन दिवस लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशातच औरंगाबाद येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोविन अ‍ॅप (CoWIN) हॅक करुन डोस न घेताच प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलं आहे. २८ ऑगस्टला डीकेएमएम या केंद्रावर हा प्रकार घडला आहे. दरम्यान महापालिकेच्या (aurangabad corporation) आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर हे केंद्र ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे डोस न घेताच लसीचं प्रमाणपत्र मिळवणारं रॅकेट सक्रिय झाले असल्याचे समोर आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, टोकन पद्धतीने सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे.
शनिवारी डीकेएमएम महाविद्यालयात डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या कमी होती.
पहिल्या टप्प्यात ५५ टोकन वाटले होते. प्रत्येक व्यक्तीचं आधी रजिस्टरमध्ये नोंदणी केली जात होती.
त्यानंतर कोविन पोर्टलमध्ये नोंद घेतली जात होती. लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदी बरोबर झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी अ‍ॅप तपासले.
त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले कि या केंद्रावत ७१ नोंदी झाल्या आहेत.
मात्र टोकन तर ५५ दिली गेली होती. त्यांनी तत्काळ ही माहिती वॉररुमच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली.
त्यानंतर राठोड यांनी तात्काळ या केंद्रावरील लसीकरण थांबवलं.

आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा आणि अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे यांना याबाबतची माहिती दिली. या केंद्रावर ऑपरेटर शकील हे आतापर्यंत स्वतःच्या वैयक्तिक लॅपटॉपवरुन ऑनलाईन नोंदणी करत होते.
मात्र शनिवारी पहिल्यांदाच त्यांनी महाविद्यालयाचा कॉम्प्युटर नोंदणी करण्यासाठी वापरला
आणि त्याच दिवशी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महापालिकेने हे केंद्र बंद ठेवले असून या प्रकरणी संपूर्ण चौकशी होईपर्यंत हे केंद्र सुरु करण्यात येणार नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केले आहे.

 

Web Title : CoWIN | cowin application registration hack in aurangabad municipal corporation lodged complaint in police

 

हे देखील वाचा :

Pune News | दुर्देवी ! भरधाव PMPML बसच्या धडकेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

Jayant Patil | ‘वाझे प्रकरणात ‘1 नंबर’ म्हणजे मुंबईचे पोलिस आयुक्तच

Satara Crime | लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं शोले स्टाईलनं आंदोलन करत केला आत्महत्येचा प्रयत्न

 

Related Posts