IMPIMP

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘त्या दिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता’

by sikandershaikh
nitin-raut

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)12 ऑक्टोबर रोजी राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीज पुरवठा सकाळी 10 वाजता खंडित झाला होता. त्यानंतर अडीच-तीन तास गेल्यानंतर हा वीजपुरवठा सुरळीत झाला. मुख्य म्हणजे कोरोना संकट असल्यानं हॉस्पिटलमधील वीज पुरवठ्याबाबत प्रशासन चिंतीत होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व विभागांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. इतकंच नाही तर त्यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेतही दिले. त्यानंतर आता मुंबईतील वीज पुरवठा खंडित होणं हे घातपात असल्याचा निष्कर्ष हाती आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सायबर विभागाकडून सायंकाळी वीज पुरवठा खंडित प्रकरणाचा अहवाल येणार असून सर्व स्पष्टीकरण दिलं जाईल अशी माहिती नितीन राऊत यांनी विधीमंडळात बोलताना दिली.

‘मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता’

नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले, मुंबई अंधारात गेली होती, मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. त्यावेळी मी घातपात असल्याचं सूतोवाच केलं होतं. परंतु अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून माल सायंकाळी 6 वाजता अहवाल देण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळेल. वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो रिपोर्ट आलाय, त्याबाबत सर्व माहिती ती तिथंच देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलं ?

– 10 ऑक्टोबर पासून कळवा-तळेगाव पॉवर ग्रीड ब्रेकडाऊन होती.

– सोमवारी सकाळी 4.33 वाजता कळवा पडघा ही लाईन ट्रीप झाली.

– त्यानंतर कळवा पडघा ही लाईन 10.10 वाजता कोलमडून गेली.

– तळेगाव खारघर ही लाईन 2 वाजता ट्रीप झाली.

– पालघर ग्रीडच्या 3 लाईन्स 10.5 वाजता ट्रीप झाल्या.

– तळेगाव खारघर या ग्रीडमध्ये तर शॉर्ट सर्किट सारख्या ठिणग्या उडत होत्या.

– या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मुंबईत बत्ती गुल झाली.

‘त्या’ मुद्द्यावरून अजित पवारांनी केली विरोधकांची कोंडी, म्हणाले- ‘आधी 12 आमदारांची नावं, त्यानंतरच…’

Related Posts