IMPIMP

नाना पटोले संतप्त; म्हणाले – ‘फडणवीस म्हणजे काय NIA आहे का?’

by pranjalishirish
nana patole slams devendra fadnavis over parambir singh letter bomb

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिव यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘कॉल डिटेल्स रेकॉर्ड’ (CDR) दिला होता. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole चांगलेच संतापले आहेत. ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा (NIA) आहे का? त्यांच्याकडे हे पुरावे आलेच कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘दूध का दूध, पानी का पानी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

दिल्लीत जाऊन फडणवीस यांनी पुरावे दिले आहेत. त्यांनी सीडीआरही दिला आहे. त्यावर नाना पटोले Nana Patole म्हणाले, ‘राज्यात एटीएस योग्यरित्या काम करत असताना आणि या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आलेला असतानाच एनआयए न्यायालयात जाऊन तपास स्वत:कडे घेतला. फडणवीस यांनी केलेले आरोप म्हणजे प्रत्येकाला दोषी ठरवून राजीनामा घेत बसायचे का? असे म्हणत फडणवीस म्हणजे एनआयए आहे का? असा सवाल उपस्थित केला. तसेच दिल्लीला जाऊन फडणवीस सीडीआर देतात, पुरावे देतात. पण फडणवीस यांच्याकडे हे पुरावे आलेच कसे? त्यांनी मिळवलेला सीडीआर हा खोटा आहे. ते फक्त खोटे आरोप करतात आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेवर चिखल उडवण्याचे काम करतात, असेही ते म्हणाले.

अजित पवारांचा विरोधकांना टोला, म्हणाले -‘आमचे सरकार पडेल ही विरोधकांची पहिल्या दिवसापासूनची इच्छा, पण…’

 

दरम्यान, भाजपच्या आरोपातून राज्य सरकारची नाही तर महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यांच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. खोटे आरोप करण्याची त्यांची प्रथा आहे. हाच आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. महाराष्ट्राची जनता भाजपने सुरु केलेला खेळ कधीही विसरणार नाही, असेही पटोले Nana Patole  म्हणाले.

Also Read : 

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

Related Posts