IMPIMP

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

by pranjalishirish
nanded district co operative bank election bjp mlc ram ratolikar helps ashok chavan against bjp mp pratap patil chikhalikar

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. रविवारी झालेल्या मतमोजणीत 21 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीच्या पॅनेलने विजय मिळवला. तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खा. प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला. केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. पण आता चव्हाण यांना भाजप BJP आमदारांनी मदत केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळं नांदेड मधील भाजपमधील BJP गटबाजी उघड झाली आहे. जिल्हा भाजपमध्ये खा. चिखलीकर यांचा एक गट आहे. इतर स्थानिक नेत्यांचा दुसरा गट आहे. स्थानिक नेत्यांचा गट सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व संपादन केले असले तरी काँग्रेसच्या या यशामागचे बिंग फुटले आहे. आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे बिंग फुटले आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये आमदार राम पाटील रातोळीकर म्हणतात, जिल्हास्तरावर आपणास हेलिकॉप्टर निशाणीला मतदान करायचे आहे. आपल्या सर्व विश्वासू मंडळींना तसा निरोप द्या. मला बिनविरोध लढायचे निश्चित झाले होते. कुंटूरकर यांनी तशी तयारी दाखवली होती. ते उमेदवारी माघारी घेणार होते. मात्र खासदारांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे आपणास कोणत्याही परिस्थितीत खासदारांची माणसे निवडून येऊ देयची नाहीत.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आमदार राम पाटील रातोळीकर यांनी मोबाईलवरुन काही मतदारांशी साधलेला संवाद लपून राहिला नाही. त्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजपला BJP या गटबाजीचा फटका बसला असून या निवडणुकीत भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पक्षातील या अंतर्गत गटबाजीवर भाजपमधील वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात, हे पहावे लागणार आहे.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

Related Posts