IMPIMP

Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…

by nagesh
Bombay High Court | bombay high court ncp minister nawab malik ncb sameer wankhede

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nawab Malik | मुंबई एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने धक्कादायक आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक आरोपाचा बाॅम्ब टाकला आहे. ‘नाव समीर दाऊद वानखेडे आणि त्यांचा धर्म मुस्लीम लिहीला असल्याचा कागदपत्रांचे पुरावे समोर आणले आहेत. यावेळी समीर वानखेडे हे खोटे कागपत्र आणि खोट्या नोटांचे मास्टर असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर (Mumbai Drugs Case) आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नवाब मलिकांनी वानखेडे यांच्यावर केलेले आरोप हे खळबळून सोडणारे आहेत. रोज नवे खुलासे समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातही चांगल्यांच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, समीर वानखेडेंच्या बद्दलचे खरे कागदपत्र आम्ही न्यायालयालमोर ठेवले आहेत. वानखेडेंनी सर्व महानगरपालिकेच्या (BMC) कागपत्रांवर खाडा-खोड करून 1993 साली नवा रेकॉर्ड तयार केला. तसेच कागदपत्र गहाळ करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र त्यांना माहिती नव्हतं की हे स्कॅन करून ठेवलेले असतात. याच आधारावर ते सर्व करत आहेत, मात्र त्यांच्या जन्मापासूनच फर्जीवाडा सुरू असल्याचा आरोप नवाब मलिकांनी (Nawab Malik) केला आहे.

 

दरम्यान, तसेच, मलिकांनी समीर वानखेडे (Nawab Malik) हे नकली नोटांचे सुद्धा खेळाडू असल्याचा आरोप केला आहे.
समीर वानखेडेंनी एका प्रकरणात 14 कोटी 56 लाख पकडले होते,
त्यावेळी ते 8 लाख दाखवून त्यांनी आरोपींना मदत केली होती
असं म्हणत नवाब मलिक यांनी हे खोट्या नोटा आणि खोटी कागदपत्राचे हे खेळाडू असल्याचा देखील आरोप केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Nawab Malik | ncp minister nawab malik new allegation against ncb officer sameer wankhede on fake currency

 

हे देखील वाचा :

Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, कडून 120 कोटींचा माल ताब्यात

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर

 

Related Posts