IMPIMP

Nawab Malik | ‘कबूल है, कबूल है, कबूल है…’ ! नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’

by nagesh
Nawab Malik | ncp minister nawab malik posted new photo of ncb officer sameer wankhede twitter marathi news policenama

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन गेल्या काही दिवसापासून ड्रग्ज प्रकरणावरून (Mumbai Drugs Case) मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हे सत्र काही थांबेना. या वादात कुटूंबातील सदस्यांनीही उडी घेतली आहे. दरम्यान, मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर मध्यरात्री ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. त्यांनी वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला असून काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत या फोटोबॉम्बमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर समीर वानखेडे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मलिक यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि अन्य एक व्यक्ती दिसून येत आहे. हा फोटो समीर यांच्या निकाहच्या वेळेचा असल्याचे दिसून येत आहे. या फोटोबाबत मलिक यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसून काही सवाल उपस्थित केले आहेत. ‘कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?’ असे प्रश्नार्थक ट्विट मलिक यांनी केले आहे.

नवाब मलिक हे सध्या शासकीय दुबई (Dubai) दौऱ्यावर गेले आहेत. तेथून त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्पूर्वी समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असा दावा मलिक यांनी केला आहे. त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा (defamation case) समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (dnyandev wankhede) यांनी दाखल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मलिक-वानखेडे यांच्या वादात मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान (nilofer malik khan)
आणि सना मलिक शेख (sana malik shaikh) यांनीही उडी घेतली आहे.
त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे.
लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखलाही पोस्ट केली होती. यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे (Dawood Wankhede) असे लिहिलेले आहे.
त्यानंतर समीर यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने मलिक यांच्या बार रेस्टॉरंटच्या आरोपाला चोख उत्तर दिले होते.
यानंतर आता नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हा फोटोबॉम्ब टाकला आहे.

Web Title :- Nawab Malik | ncp minister nawab malik posted new photo of ncb officer sameer wankhede twitter marathi news policenama

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | साेन्याच्या दरात वाढ तर चांदीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | जीव देण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; चंदननगर पोलिसांकडून 19 वर्षाच्या तरुणाला अटक

Pune News | लहू बालवडकरांनी आयोजित केलेला पादुका दर्शन सोहळा म्हणजे अनंत-अनंदाची प्राप्ती; कालीचरण महाराजांचे गौरोद्गार

Related Posts