IMPIMP

Dilip Walse Patil : एकेकाळी दिलीप वळसे-पाटील होते शरद पवारांचे PA अन् आता…

by pranjalishirish
NCP dilip walse patil likely to replace anil deshmukh as maharashtra home minister

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) केली जाणार आहे. त्यानंतर नैतिकेची जबाबदारी स्वीकारत अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला असला तरी आता या पदावर राष्ट्रवादीकडून NCP कोण असेल हा मोठा चर्चेचा विषय आहे.

‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे नाव या पदासाठी घेतले जात आहे. त्यामध्ये दिलीप वळसे-पाटील यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. वळसे-पाटील हे राष्ट्रवादी  काँग्रेसच्या  NCP प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी विविध पदे भूषवली आहे. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले दिलीप वळसे सध्या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदही सांभाळले आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

आता त्यांची गृहमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. वळसे-पाटील यांच्या नावावर राष्ट्रवादीत  NCP एकमत झाले असून, त्यांच्याकडील उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर कामगार विभागाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे दिली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

कोण आहेत दिलीप वळसे-पाटील?

– आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा विधानसभेवर

– विधिमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव

– 2009 ते 2014 या कालावधीत विधानसभा अध्यक्ष

– शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम

– राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते

– वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

Related Posts