IMPIMP

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

by bali123
ncp leader ajit pawar son parth pawar reaction on maharashtra budget

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारकडून सोमवारी (दि. 8) विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प budget सादर करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दुपारी बजेट सादर केले. राज्यातील सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. या बजेटवर राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी हे बजेट महाराष्ट्राचे आहे की, मुंबई महापालिकेचे ? अशी टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी वडिलांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर budget ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, अशी अपेक्षा पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्याच्या बजेटवर कोरोना महामारीचा परिणाम झाला असताना ही अर्थसंकल्पात विकासाच्या सर्वच गोष्टींना प्राधान्यक्रम देण्यात आला, ही उल्लेखनीय बाब आहे. या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

  • 1. कर्जमुक्तीनंतर 42 हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं
    2. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटींचा महावितरणला निधी
    3. विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी
    4. कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना प्रत्येक वर्षी 200 कोटींची तरतूद
    5. आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद
    6. सरकारी रुग्णालयात आगरोधक उपकरणे लावण्यात येणार
    7. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
    8. शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले आहे. अशांना शून्य टक्के व्याजदराने        कर्ज मिळणार, कर्जाचे व्याज सरकार भरणार
    9. कोरोना काळात औद्योगिक घट झाली. मात्र, बळीराजाने तारले. शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्याचा सरकारचा प्रयत्न
    10. जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांसाठी 12 हजार 919 कोटींचा निधी
    11. जलसंधारण विभागासाठी 2 हजार 60 कोटींचा निधी प्रस्तावित
    12. पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लगाणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल
    13. पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव
    14. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेली रेवस-रेडी मार्गासाठी 9573 कोटींचा खर्च अपेक्षित
    15. गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 कोटींची तरतूद
    16. महत्त्वाच्या 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी
    17. ग्रामविकास विभागासाठी 7350 कोटींचा निधी प्रस्तावित
    18. निसर्ग चक्रीवादळ आणि राज्यातील आपत्ती पाहून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तुकडी कायमस्वरूपी                  ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी
    19. पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16 हजार 139 कोटी मंजूर

  • Maharashtra Budget 2021 : अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय आलं ?, अर्थमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

Related Posts