IMPIMP

शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते? जयंत पाटलांनी सांगितलं, म्हणाले…

by pranjalishirish
ncp leader jayant patil sharad pawar and amit shah secret meeting gujarat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात गुजरातमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा दि 28 मार्च रोजी (रविवारी) राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादीनं यावर बोलताना अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. परंतु तिघांचीही अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचं वृत्त एका गुजराती वर्तमानपत्रानं दिलं होतं. यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगता येत नाही असं म्हणत अमित शाह यांनीही सस्पेंस वाढवला. यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आता यावर भाष्य केलं आहे. एका वृत्तावाहिनीसोबत ते बोलत होते.

Jayant Patil : ‘नोटांबदीपासून ते लसीकरणाचे निर्णयही नजरचुकीने घेतले असावेत’

‘राष्ट्रवादी भाजपच्या जवळ जाणार नाही, त्यांना केवळ सत्तेची स्वप्न पडताहेत, पण महाविकास आघाडी भक्कम आहे’

जयंत पाटील Jayant Patil  म्हणाले, शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीच्या वृत्तात कसलंही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळं भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही. भाजपला केवळ सत्तेची स्वप्न पडत आहेत. पण महाविकास आघाडी भक्कम आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

‘साखर उद्योगातील परिषदेसाठी पवार साहेब अहमदाबादला गेले होते’

पुढं बोलताना जयंत पाटील Jayant Patil  म्हणाले, साखर उद्योगातील परिषदेसाठी पवार साहेब अहमदाबादला गेले होते. भाजपकडून पवार-शाह यांच्या भेटीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आमची महाविकास आघाडी तोडण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

Related Posts