IMPIMP

‘…त्यावेळी परमबीर सिंग-सचिन वाझे यांची तीन तास बंद दरवाजाआड चर्चा’, ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

by pranjalishirish
ncp leader nawab malik refutes all charges of parambir singh says he is talking bjp language

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग  Parambir Singh यांच्या ‘लेटरबॉम्ब’ नंतर ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून केले जात आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट केला आहे. ‘वाझेला अटक होणार हे कळताच आदल्या रात्री परमबीर सिंग हे पोलिस मुख्यालयात तीन तास बंद दरवाजाआड त्याच्याशी चर्चा करत होते’, असे मलिक म्हणाले.

Girish Bapat : ‘पवारांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य समोर येणार अन् ‘दूध का दूध’, ‘पानी का पानी’ होणार’

परमबीर सिंग Parambir Singh यांच्या पत्रानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच यासह इतर मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला विरोधकांकडून घेरले जात आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ‘सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकडून कुठलाही आदेश नव्हता. परमबीर सिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या समितीने याबाबतचा निर्णय घेतला होता. त्याची पोस्टिंगही परमबीर सिंग यांच्या अधिकारातच करण्यात आली. टीआरपी घोटाळ्यात सुरुवातीला परमबीर सिंग प्रचंड सक्रिय होते. पण गेले दोन-तीन महिने थंड होते. त्यांच्यावर कुठला दबाव होता माहीत नाही’.

‘महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी’, संजय राऊतांचे मोठं विधान

तीन तास बंद दरवाजाआड चर्चा

‘सचिन वाझे याच्याशी परमबीर यांचे अत्यंत उत्तम संबंध होते. वाझेला अटक होणार हे कळताच आदल्या रात्री परमबीर सिंग Parambir Singh हे पोलिस मुख्यालयात तीन तास बंद दरवाजाआड त्याच्याशी चर्चा करत होते. मुंबई पोलिसांतील प्रत्येक अधिकाऱ्याला याची माहिती होती,’ असा आरोपही मलिक यांनी केला.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

व्हॉट्सऍपवरून पुरावे तयार

17 तारखेला आपली बदली होणार हे कळताच 16 तारखेला परमबीर सिंग Parambir Singh  यांनी व्हॉट्सऍपवरून पुरावे तयार केले. त्यांनी पहिला आरोप गृहमंत्र्यांनी टार्गेट दिल्याचा केला होता. मात्र, तो खोटा आहे. सनसनाटी निर्माण करण्यासाठीच त्यांनी हे केले होते, असेही मलिक म्हणाले.

Also Read :

‘जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान’ ! ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर टीका

खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार

रोहित पवारांनी भाजपला घेरलं !

‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts