IMPIMP

Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

by pranjalishirish
ncp leader rohit pawar criticised bjp over phone tapping issue

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी, रश्मी शुक्ला यांनी केलेलं फोन टॅपिंग व त्यात आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. हा अहवाल कुंटे यांनी तयारच केलेला नसून कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केलेला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रत्यक्षपणे फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

शशी थरूर यांनी मागितली PM नरेंद्र मोदींची माफी

‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

रोहित पवार Rohit Pawar यांनी काही ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी भाजप आणि फडणवीसांवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही अनुभवी नेत्यांचं म्हणणं आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार आणि मुख्य सचिव असं करणार नाहीत. याची खात्री आहे असा विश्वासही पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

‘महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच फोन टॅपिंग षडयंत्र’

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये रोहित पवार  Rohit Pawar म्हणतात, मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच फोन टॅपिंग षडयंत्र रचण्यात आलं काय अशी शंका या अहवालावरून येत आहे. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल असं पवारांनी सांगितलं.

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

‘राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला तो त्यांनी तयारच केलेला नाही’- फडणवीस

दरम्यान या अहवालावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो. ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केलेला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

Related Posts