IMPIMP

‘फाटक्या जीन्स’मुळे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्यावर नेटीझन्सकडून टीकेची झोड

by bali123
Netizens criticize Chief Minister Tirath Singh Rawat for 'ripped jeans'

डेहराडूनTirath Singh Rawat | उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत Tirath Singh Rawat हे आता वादात सापडले आहेत. महिलांबाबत केलेल्या विधानावरून त्यांना नेटकऱ्यांनी लक्ष्य केले आहे. रावत यांच्या विधानावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही रावत यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

तीरथसिंह रावत Tirath Singh Rawat यांनी फॅशन म्हणून महिलांकडून परिधान केल्या जाणाऱ्या फाटक्या जीन्सवर टीका केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशा प्रकारचे कपडे घालून महिला आपल्या मुलांना काय शिकवण देतील, असा सवाल रावत यांनी उपस्थित केला होता. रावत यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांनी त्यांचे विधान लाजीरवाणे असल्याचे सांगत माफीची मागणी केली आहे. रावत यांच्या वक्तव्यावर नेटीझन्सनी देखील टीकेची झोड उठविली होती.

मंगळवारी येथील एका कार्यक्रमात रावत यांनी हे वादग्रस्त विधान केलं होत.
कार्यक्रमात बोलताना रावत यांनी स्वतः विमानात अनुभवलेला प्रसंग सांगितला होता.
बूट घातलेल्या महिलेने अशीच दोन्ही गुडघ्यांवर फाटलेली पँट घातली होती, तिच्या हातामध्ये बऱ्याच बांगड्या देखील होत्या.
विशेष म्हणजे ती आपल्या दोन मुलांसमवेत प्रवास करत होती.
समाजामध्ये वावरणारी, एनजीओ चालविणारी महिला फाटकी जीन्स घालणार असेल तर ती कोणत्या
प्रकारची मूलांना शिकवण देऊ पाहत आहे?
असा सवाल रावत यांनी उपस्थित केला होता.

संजय राऊत यांना भाजपचा इशारा; ‘चुकीची कामे केली तर…’

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठया निर्णयाची शक्यता

अभिनेते सतिश कौशिक यांना ‘कोरोना’ची लागण !

Related Posts