IMPIMP

संजय राऊत यांना भाजपचा इशारा; ‘चुकीची कामे केली तर…’

by pranjalishirish
sanjay raut reaction on parambir singh letter to cm uddhav thackeray

मुंबई : मनसुख हिरेन आणि सचिन वाझे Sachin Vaze  प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापत आहे. याच प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. त्यांच्या या बदलीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यानंतर आता या ट्विवरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. ‘चुकीची कामे झाली तर वावटळीच वादळात रूपांतर जनताच करेल’, असे ते म्हणाले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे Sachin Vaze  यांच्यावर संशय घेतला जात आहे. त्यानुसार त्यांची चौकशीही सुरु आहे. या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला. त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा संदर्भ देत केशव उपाध्ये यांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘ही महान परंपरा राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्व नियम पायदळी तुडवत 16 वर्षानंतर सचिन वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत घेताना ही परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का? चुकीची कामे झाली तर वावटळीच वादळात रूपांतर जनताच करेल’, असा इशारा त्यांनी दिला.

काय केलं होतं संजय राऊत यांनी ट्विट

‘मुंबई तसेच महाराष्ट्र पोलिस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलिस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलिस दलाची पडझड होईल, या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिंमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर आता केशव उपाध्ये यांनी याचा समाचार घेत नवं ट्विट केले आहे.

Also Read :

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts