IMPIMP

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठया निर्णयाची शक्यता

by pranjalishirish
maharashtra cm uddhav thackeray calls urgent meeting rising corona virus cases

सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा  Corona प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23 लाख 70 हजार 507 झाली आहे. देशाच्या 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने देखील तातडीने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. वाढत्या कोरोना Corona  रुग्णांच्या संख्य़ेला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

राज्यात बुधवारी एका दिवसात कोरोनाचे  Corona 23 हजार 179 रुग्ण सापडले होते. तर 84 जणांचा मृत्यू झाला होता. आजही यात तेवढीच वाढ होण्याची शक्यता आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23 लाख 70 हजार 507 झाली आहे. तर बळींचा आकडा 53 हजार 80 पर्यंत पोहोचला आहे. सध्या राज्यात 1 लाख 52 हजार 760 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यात 56 टक्के कोरोना लस शिल्लक असल्याचे सांगत लस का वापरली नाही, आताही गोंधळ सुरु आहे असा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बोलताना राज्यात 10 दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा असल्याचे सांगितले. तसेच आणखी लस देण्याची मागणी केली. यावर लसीकरण वाढविण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे.

Also Read :

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts