IMPIMP

Nitesh Rane | नितेश राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका ! 10 दिवसांत शरण येण्याची मुदत

by nagesh
Nitesh Rane | supreme court grants 10 days protection from arrest to maharashtra bjp mla nitesh rane and directs him to surrender before the trial court

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासिंधुदुर्गातील शिवसेना (Sindhudurg Shivsena) कार्यकर्ता संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी (Attack Case) भाजपचे नेते आणि आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) फेटाळून लावला असून त्यांना येत्या 10 दिवसात जिल्हा न्यायालयासमोर (District Court) शरण (Surrender) येण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सिंधुदुर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली. परंतु मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी (Senior Lawyer Mukul Rohatgi) यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली. यात राज्य सरकार (State Government) सूडबुद्धीनं त्यांच्यावर कारवाई करत असल्याचा दावा केला. परंतु सरकारी वकिलांनी (Government Prosecutor) सर्व दावे फेटाळून लावत नितेश राणे यांच्याविरुद्ध याआधीच अनेक आरोप आहेत. संबंधित प्रकरणात नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. याचा राजकीय सूडाचा प्रश्नच नाही, असा प्रतिदावा सरकारी वकिलांनी केला.

 

 

यानंतर सुप्रीम कोर्टानं केलेल्या सुनावणीत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. मात्र, त्याचवेळी त्यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली. यानुसार पुढील 10 दिवस पोलीस नितेश राणे यांना अटक (Arrest) करु शकत नाही. शरण झाल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनासाठी अर्ज करु शकतात. त्यामुळे नितेश राणे यांच्यासमोर आता जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालनंतर नितेश राणे काय पाऊल उचलणार हे पहावं लागणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Nitesh Rane | supreme court grants 10 days protection from arrest to maharashtra bjp mla nitesh rane and directs him to surrender before the trial court

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | केज नगर पंचायतीत धनंजय मुंडेंना जोरदार धक्का; भाजप काँग्रेसच्या साथीने करणार सत्ता स्थापन

Shweta Tiwari Controversial Statement | श्वेता तिवारीनं केलं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली – ‘माझ्या ब्रा ची साईज..’ (व्हिडिओ)

IPS Sanjay Pandey | संजय पांडे यांची कामगिरी उत्कृष्ट ! तरीही UPSC नं महासंचालक पदासाठी शिफारस केली नाही

Cough Problem | सतत होत असेल खोकला तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जीवघेणे असू शकते कारण

 

Related Posts