IMPIMP

Jitendra Awhad : ‘तुटवडा असतानाही बांगलादेशला ऑक्सिजन द्यायची गरज काय होती?’

by Team Deccan Express
oxygen supply shortage in maharashtra jitendra awhad slams bjp government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्ससारख्या सुविधा मिळत नाही. त्यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी ट्विट करत मोदी सरकारला सवाल उपस्थित केला आहे. ‘ऑक्सिजनचा आपल्याकडे तुटवडा असताना बांगलादेशला ऑक्सिजन द्यायची काय गरज होती?, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात वाढती कोरोनाबाधित संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण येत आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची मोठ्या प्रमाणात गरज असताना त्याचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारकडून बांगलादेशला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी ट्विट करत निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘संतप्त न्यायालयाने ‘भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या’ दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावले. ज्या प्राणवायूने संपूर्ण जीवसृष्टी जिवंत आहे त्या प्राणवायूची सध्या कित्येक रुग्णांना आत्यंतिक गरज आहे आणि केंद्र सरकार त्याचा पुरवठा करत नाहीये…’

तसेच रेमडेसिव्हिरची दररोज महाराष्ट्रमधील मागणी 50,000 ची मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33,000 ते 36,000 पुरवते आहे. आता केंद्र सरकारनी ताब्यात घेतले. आत्ता महाराष्ट्राला मिळणार 26,000 महाराष्ट्राचा असा छळ कश्यासाठी?, असा सवालही उपस्थित केला आहे.

Social Media Reactions : ‘मुख्यमंत्री साहेब, 2 तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’

पंतप्रधान बंगालच्या निवडणुकांमध्ये बिझी…
राज्यातील विविध मुद्द्यांवर केंद्राशी बोललो, तर पंतप्रधान बंगालच्या निवडणुकांमध्ये बिझी असल्याचे सांगण्यात आले. पीपीई किट, व्हेंटिलेटरही केंद्राने महाराष्ट्राला कमी दिले. ऑक्सिजनचा देखील कमी पुरवठा केला जात आहे, असेही जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी सांगितले.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts